spot_img
अहमदनगर'अक्षय तृतीयानिमित्त श्री विशाल गणेशाला ५१०१ आंब्यांचा नैवेद्य'

‘अक्षय तृतीयानिमित्त श्री विशाल गणेशाला ५१०१ आंब्यांचा नैवेद्य’

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात अक्षय तृतीयानिमित्त श्री विशाल गणेशाला 5101 आंब्यांचा नैवेद्य दाखवून आंब्यांची सजावट करण्यात आली होती. सकाळी अभिषेक करण्यात आला. दुपारी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, राखी फिरोदिया यांच्या हस्ते महापुजा करुन आरती करण्यात आली.

याप्रसंगी पुजारी संगमनाथ महाराज, याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त पांडूरंग नन्नवरे, प्रा.नितीन पुंड, चंद्रकांत फुलारी, गौरव भंडारी, अनुष्का फिरोदिया, हर्ष बोकडिया, सोहम फिरोदिया, निवेदक राजेंद्र टाक, गणेश राऊत आदि विश्वस्त उपस्थित होते.

याप्रसंगी अशोकराव कानडे म्हणाले, ‘अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला. या दिवशी सत्ययुगाचा प्रारंभ झाली. अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय तृतीया या संपूर्ण दिवसाला ‘मुहूर्त’ म्हणतात. या दिवसाला साडेतीन मुहूर्तांतील एक मुहूर्त मानले जाते.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सातत्याने सुख-समृद्धी प्राप्त करून देणार्‍या देवतेची कृतज्ञतेचा भाव ठेवून उपासना केल्यास देवतेच्या कृपादृष्टी कायम आपल्यावर राहते. या काळात केलेले दानही सर्वात पवित्र मानले जाते. असेच अक्षयतृतीयानिमित्त आंबा स्वरुपात भाविकांनी दान दिले असल्याचे सांगून भाविकांना दर्शन सुलभ व्हावे, यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या असल्याचे सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राज्यावर अवकाळी पावसाचं संकट; पश्चिम महाराष्ट्रात अलर्ट, ‘या’ जिल्ह्यांना पावसाने झोडपलं

पुणे / नगर सह्याद्री : राज्यभरातील थंडी आता गायब झाल्याचं चित्र आहे. अनेक जिल्ह्यांत...

तिघांच्या सामूहिक आत्महत्येचे गूढ उकलले, धक्कादायक कारण आलं समोर

परभणी / नगर सह्याद्री - परभणीच्या गंगाखेडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या...

महागाईपासून दिलासा नाहीच! रेपो रेट जैसे थे, EMI वर काय परिणाम होणार?

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - (RBI REPO Rate) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीच्या...

तिसर्‍यांदा देवेंद्र पर्व ; काय काय घडलं पहा

एकनाथ शिंदे, अजित पवार नवे उपमुख्यमंत्री / आझाद मैदानावर शपथविधी सोहळा संपन्न  मुंबई | नगर...