spot_img
अहमदनगरMaratha Reservation: महाराष्ट्र बंदला नगरमध्ये प्रतिसाद: 'या' गावांमध्ये कडकडीत बंद

Maratha Reservation: महाराष्ट्र बंदला नगरमध्ये प्रतिसाद: ‘या’ गावांमध्ये कडकडीत बंद

spot_img

राज्यभरात अनेक ठिकाणी बंद | जिल्ह्यांमध्ये शुकशुकाट
अहमदनगर | नगर सह्याद्री
राज्य सरकारने काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा करावा, तसेच तत्काळ अधिवेशन बोलावून मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी जरांगेंनी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा (बुधवार) पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी राज्य सरकारच्या निषेधार्थ मराठा आंदोलकांकडून बंद पाळण्यात आला आहे. या महाराष्ट्र बंदला नगरमध्ये उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. कर्जत, पारनेर, श्रीगोंदा, जामखेड तालुयात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मराठा आरक्षणासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्याकरिता मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. राज्यातील अनेक भागात बंद पुकारण्यात आला आहे. या भागात बंदला चांगला प्रतिसाद मिळत असून शुकशुकाट पसरला आहे. तर, काही ठिकाणी मराठा आंदोलकांनी आंदोलन केलं आहे. भररस्त्यावरच टायर जाळून निषेध नोंदवल्याने वाहतूक कोंडीचीही समस्या उद्भवली आहे. दरम्यान, आम्ही शांततेत आंदोलन करणार आहोत, असं मराठा आंदोलकांनी म्हटले आहे.

नगरमध्ये सकल मराठा समाज व मराठा बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून माणिक चौक, कापड बाजार, दिल्ली गेट अशी पायी रॅली काढत नगरवासियांना बंदचे आवाहन केले. एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिंदे सरकार मर्दा बाद अशा सरकार विरोधी घोषणाबाजी केली. महाराष्ट्र बंदला अहमदनगर शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. अनेक ठिकाणी व्यापारीही बंदमध्ये सहभागी झाले आहेत.

मराठा आरक्षणाच्या अहवालासाठी वेळ वाढवून द्यावा ः आयोग
मराठा आरक्षणाच्या अहवालासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारकडे आणखी वेळ मागितल्याचे समोर आले आहे. मराठा आरक्षणाच्या अहवालाचं काम अजून पूर्ण झालेलं नाही त्यामुळे आणखी २ ते ३ दिवस वाढवून देण्याची विनंती मागासवर्ग आयोगाने केली आहे. मराठा आरक्षणाच्या अहवालासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारकडे आणखी वेळ वाढवून मागितला आहे. मराठा आरक्षणाच्या अहवालाचे काम अजून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आणखी २ ते ३ दिवस वाढवून देण्याची विनंती राज्य मागासवर्ग आयोगाने केली आहे.

श्रीगोंदा कडकडीत बंद
श्रीगोंदा | मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे बुधवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला श्रीगोंदा तालुक्यामधून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरात कडकडीत बंद पाळल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. तालुका बंद मधून मेडिकल, हॉस्पिटल व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली होती. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी १० फेब्रुवारी रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मराठा समाज आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढून सरकारला आरक्षणाची मागणी करत आहे. सरकारला वेळ देऊन सुद्धा सरकार वेळ काढू पणा करत आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषण करत आहे. त्यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून महाराष्ट्र बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील गाव कडेकोट बंद पुकारण्यात आला होता.

निघोज बंद १०० टक्के यशस्वी
निघोज | मराठा समाजाला इतर मागासवर्ग प्रवर्गातून कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे, सग्यासोयर्‍यांना सरसकट आरक्षण मिळावे. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी १० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण सुरु केले आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी निघोज व परिसरातील व्यवसायीक, दुकानदार यांनी १०० टक्के दुकाने बंद ठेऊन उपोषणाला पाठिंबा दिला आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने १४ फेब्रुवारी, बुधवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. बंदमध्ये पारनेर शहरासह तालुक्यातील जनतेने, व्यापार्‍यांनी उस्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन पारनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले होते. तसेच पारनेर तालुका पत्रकार संघ व पारनेर तालुका मराठी पत्रकार संघ यांनीही मंगळवार दि.१३ रोजी सोशल मिडिया माध्यमातून बंदमध्ये सहभागी होऊन उपोषनकर्ते मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. बंदमध्ये सहभागी होऊन निघोज व परिसरातील व्यवसायीक व दुकानदार सहभागी झाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रस्थापितांनी धसका घेतलेले शिवाजीराव!

सारीपाट / शिवाजी शिर्के वसुबारसेच्या निमित्ताने सारेजण उत्साहात सकाळची आवराआवर करत असताना दूध उत्पादक...

कोल्हेवाडीत थरार! तरुणाने पेटवली कार; भांडण सोडवणे पडले महागात

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- भांडण सोडवण्याचा प्रयत्न एका महिलेला चांगलाच महागात पडला. नगर तालुक्यातील...

नगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी परत मिळणार?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री भारतीय रिझर्व बँकेने नगर अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना 4 ऑक्टोबर...

शहराच्या मध्यवर्ती भागात कोयता गँगचा कहर; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर हल्ला..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- एका २२ वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना...