मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्रात विविध संप सुरु असताना आता आणखी एक महत्वाची समोर आली आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.
त्यांचा अनेक मागण्या असून त्या मागण्यांना राज्य सरकार वारंवार दुर्लक्षित करत आहे. या मागण्यांबाबत दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत संघटनेचे चर्चा होईल. मागण्यांबाबत सरकारच्या भूमिकेनंतर संपाचा निर्णय घेण्यात येणार आहे. वाटाघाटी फिसकटल्या तर राज्यातील सर्व डॉक्टर संध्याकाळी पाच वाजेनंतर बेमुदत संपावर जाणार आहेत अशी माहिती मिळाली आहे.
काय आहेत मागण्या
१. निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेलची व्यवस्था करण्यात यावी.
२. निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे.
३. निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन ही केंद्रीय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाप्रमाणे देण्यात यावे