spot_img
ब्रेकिंगअहवाल तयार? 'तो' डाव यशस्वी करणार पण..: जरांगे पाटलांचा पुन्हा सरकारला रोखठोक...

अहवाल तयार? ‘तो’ डाव यशस्वी करणार पण..: जरांगे पाटलांचा पुन्हा सरकारला रोखठोक इशारा

spot_img

छत्रपती संभाजीनगर । नगर सहयाद्री-मला अटक करू द्या, ज्या जेलमध्ये असेन, ज्या रस्त्याने जाईल तेव्हा कोट्यवधी लोक रस्त्यावर दिसतील. मी दोषी नाही. मी समाजासाठी लढतोय. उभं आयुष्य पणाला लावलंय. ५७ लाख नोंदींच्या माध्यमातून दीड कोटी लोकांना आरक्षण मिळालं असेल. उर्वरित मराठा समाजासाठी आरक्षण मागतोय. कुठलीही यंत्रणा वापरा, काहीही झालं तरी मी हटत नाही. सत्ता असल्याने ते कधीही अटक करू शकतात. रात्रीच्या कारवाया सुरू आहेत असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी शेतकर्‍याचं पोरगं, ग्रामीण भागात राहिलोय. भाषा माझी तशीच आहे. फडणवीस आणि माझं शत्रुत्व नाही. मी कुणाला घाबरत नाही. जेलला टाका नाहीतर कुठेही टाका. माघारी परतल्यावर पुन्हा आरक्षणासाठी लढेन. संधी हातातून गेलेली नाही. सरकारच्या अंगात मोठेपण हवेत. सगेसोयरेची अंमलबजावणी करा हेच मराठे तुम्हाला डोयावर घेऊन नाचतील असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
तसेच मराठा समाजाच्याविरोधात कुणी बोललं तर मी सहन करत नाही.

कुणबी आणि मराठा एकच आहे. मी सर्वांवर टीका केली. मराठा आरक्षणाविरोधात जो कुणी जाईल त्याला सोडणार नाही. मराठ्यांच्या नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. आम्हाला आरक्षणाव्यतिरिक्त काय नको. समाज हा राज्याचा मालक आहे. सरकार मालक नाही. स्वत:च्या न्यायासाठी समाज लढतोय. तुम्ही सगेसोयरे अंमलबजावणी करा, मराठा समाज तुम्हाला डोयावर घेऊन नाचेल. मी मागे हटणार नाही. चौकशीआधीच अहवाल तयार झालाय. मला कुठेही टाकले तरी मी घाबरणार नाही असं जरांगेंनी म्हटलं.

फडणवीस त्यांचा डाव यशस्वी करतील
माझ्यात जीवात जीव आहे तोपण आरक्षणासाठी लढत राहणार आहे. फडणवीस त्यांचा डाव १०० टक्के यशस्वी करतील. त्यात ते माहीर आहेत. माझ्याविरोधात अहवाल तयार होत आलाय. मला गुंतवायचे सुरू आहे. मराठा आमदार, खासदार फडफड करायला लागलेत. नेत्याच्या बाजूने बोलतायेत असं म्हणत जरांगेंनी विरोधात बोलणार्‍या नेत्यांवर टीका केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सुटकेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह, शहरात खळबळ

Maharashtra Crime News : डोंबिवलीमधील डायघर परिसरातील खाडीत एका सुटकेसमध्ये २५ महिलेचा मृतदेह सापडला...

पारनेरचा चेतन रेपाळे उत्तर महाराष्ट्र केसरी; धुळ्याच्या ऋतिकला केले चितपट, ‘असा’ टाकला डाव..

पारनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा; शिव छत्रपती संकुलचे नाव राज्यस्तरावर पारनेर | नगर सह्याद्री नाशिक जिल्ह्यातील पाथड...

नगर शहरात चाललंय काय?, अल्पवयीन मुलाचा खुनाचा केला प्रयत्न, वाचा, नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील बालिकाश्रम रोड परिसरात सोमवार दि. २४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या...

राममंदिराच्या शिखरावर भगवा फडकला! अयोध्येत पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वाजारोहण, VIDEO समोर

अयोध्या | नगर सह्याद्री अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यावर आता आज सन्मानाने मंदिरावर...