spot_img
अहमदनगरनकली आमदार बाजूला करा अन असली पाचपुते..? श्रीगोंदाच्या सभेत खा. राऊत नेमकं...

नकली आमदार बाजूला करा अन असली पाचपुते..? श्रीगोंदाच्या सभेत खा. राऊत नेमकं काय म्हणाले..

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री-
सरकार कांदा अफगाणिस्तान मधून आयात करून शेतकर्‍याची चेष्ठा करत आहे. महाराष्ट्र राज्य हे शेतकरी कामगार कष्टकरी शूरवीरांचे राज्य आहे. विधानसभा निवडणुकीत पैश्याचा पाऊस पडला तरीही आता त्यांना सत्ता मिळणार नाही. तालुक्यात ४० वर्षे आमदार असूनही जनतेचे अनेक मूलभूत प्रश्न कायम आहेत त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी ४० वर्षे असलेला नकली आमदार बाजूला करून असली पाचपुते आमदार करा असे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले.

शनिवार दि १३ रोजी शिवसेना उपनेते साजन पाचपुते याच्या श्रीगोंदा शहरातील संपर्क कार्यालयाचे उदघाटन शिवसेनानेते खासदार संजय राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले होते. पुढे बोलतांना खा. राऊत म्हणाले, गेली ४० वर्षे सत्तेत आमदार राहूनही तालुक्यातील जनतेचे मूलभूत प्रश्न कायम आहेत, त्यामुळे नकली आमदाराला बाजूला करत असली पाचपुतेंना आमदार करा मग प्रश्न कसे सुटतात हे पहा. महाराष्टाच्या आर्थिक राजधानी मुंबईला मोदी अमित शहा यांनी पोखरायला सुरुवात करून अनेक उद्योग- धंदे गुजरातला पळविले आहेत. शेतकर्‍यांच्या कांद्याला दुधाला बाजार नाही. सरकार कांदा अफगाणिस्तान मधून आयात करून शेतकर्‍याची चेष्ठा करत आहे.

महाराष्ट्र राज्य हे शेतकरी कामगार कष्टकरी शूरवीरांचे राज्य आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीत पैश्याचा पाऊस पडला तरीही सत्ता मिळणार नाही. नगर जिल्ह्यातही लोकसभा निवडणुकीत कोट्यवधी रुपयांची उधळण केली तरीही पराभवच त्याच्या वाटी आला आहे. तालुक्यात ४० वर्षे आमदार असूनही जनतेचे अनेक मूलभूत प्रश्न कायम आहेत त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी ४० वर्षे असलेला नकली आमदार बाजूला करून असली पाचपुते आमदार करा असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी पुण्याचे वसंत तात्या मोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, बेलवंडीचे लोकनियुक्त सरपंच ऋषिकेश शेलार याची भाषणे झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका प्रमुख विजय शेंडे यांनी केले.

यावेळी आमदार सुनील शिंदे, राणी लंके, भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, नगर तालुका शिवसेनाप्रमुख राजेंद्र भगत, शरद झोडगे, जेष्ठ नेते भाऊसाहेब गोरे, शहर प्रमुख संतोष खेतमाळीस यांच्यासह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

गाव तिथे शाखा सुरु करणार
आमच्या घरात गेली ४० वर्षे सत्ता आहे. आमदार पाचपुते यांनी अनेक पक्ष बदलत मंत्रीपदे भूषवली आहेत. परंतु एकही भरदार विकासकामी केले नाही. रस्ते वीज पाणी या मूलभूत प्रश्न देखील सोडवले नाही. त्यांनी ठेकेदाराजवळ करत स्वकीयांना दूर करत टक्केवारीत जास्त लक्ष दिले आहे. मी सदाशिव पाचपुते यांचा मुलगा आहे. मला पैसे संपत्ती कमवायची नाही. जनतेची सेवा करण्यासाठी तसेच सर्व सामन्याचे प्रश्न सोडविण्यासाठी संपर्क कार्यालय सुरु केले असून गाव तिथे शाखा काढून जनतेला न्याय देण्याचे काम करत जनतेचे प्रश्न सोडविणार आहे.
– साजन पाचपुते (उपनेते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...