अहिल्यानगर | नगर सह्याद्री
राज्य शासनाने शाळांसाठी जाहीर केलेल्या नवीन नियमावलीनुसार आता शाळेपासून 1 किलोमीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकले जाणाऱ्या पानटपऱ्या नसाव्यात, असे आदेशित केले आहे. मात्र, पानटपऱ्यांसह शाळांच्या परिसरात विकले जाणारे घातक असे एनज ड्रिंक देखील हटवा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे.
हेरंब कुलकण यांनी याबाबत म्हटले आहे की, शासनाच्या या निर्णयाचे आपण स्वागत करतो. कारण दीड वर्षापूव शाळेशेजारी असलेली पानटपरी हटवली म्हणून आपणावर सुपारी देऊन प्राणघातक हल्ला झाला होता. या निर्णयाने माझे सांडलेले रक्त कारणी लागले, असे कुलकण यांनी म्हटले आहे.
फक्त याची अंमलबजावणी करताना शाळेच्या मुख्याध्यापकांसोबतच त्या गावातील ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका व पोलिस यांच्यावरही जबाबदारी निश्चित करावी. 15 जूनला शाळा सुरू होण्यापूव प्रशासनाने शाळेभोवती असलेल्या या सर्व टपऱ्या काढून द्याव्यात असेही हेरंब कुलकर्णी यांनी म्हटले आहे.