spot_img
अहमदनगरAhmednagar: नगरकरांना दिलासा!! पाणीपट्टी, मालमत्ता करवाढीतून होणार सुटका? वाचा सविस्तर..

Ahmednagar: नगरकरांना दिलासा!! पाणीपट्टी, मालमत्ता करवाढीतून होणार सुटका? वाचा सविस्तर..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
महापालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये याही वर्षी वाढ होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासक तथा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत कचरा संकलन शुल्क, अग्निशमन शुल्क व सावेडी जॉगिंग ट्रॅक मैदानाच्या भाडेदरात वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. यामुळे पाणीपट्टी, मालमत्ता कर वाढीतून नगरकरांची मुक्तता झाली आहे.

राज्य शासनाने नगरपालिकांसाठी निश्चित करून दिलेल्या दरानुसार घरातील कचरा संकलनासाठी प्रतिवर्षी २४० ऐवजी ३६० रुपये, व्यावसायिक आस्थापनांना वार्षिक ५४० ते १२ हजार रुपये शुल्क प्रस्तावित केले आहे. महासभेची मान्यता घेऊन शासनाकडे शुल्क वाढीचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

यंदाच्या वर्षी महापालिकेत प्रशासक राज असल्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित घरपट्टी व पाणीपट्टीची दरवाढ होण्याची शयता होती. मात्र, हे दोन्ही महत्त्वाचे कर वगळता उर्वरित सेवा शुल्कात वाढ प्रस्तावित केली होती. त्याला प्रशासक जावळे यांनी मंजुरी दिली आहे. कचरा संकलनासाठी राज्य शासनाने नगरपालिकांसाठी निश्चित केलेले दर मनपाने प्रस्तावित केले आहेत. यात मंगल कार्यालये व मल्टिप्लेसच्या शुल्कात मोठी वाढ केली आहे. रेकॉर्ड विभाग, अग्निशमन सेवा शुल्कात वाढीलाही मंजुरी देण्यात आली आहे. कचरा टाकणे व इतर दंडाच्या दरातही वाढ केली आहे.

प्रस्तावित शुल्क वाढ…
– रेकॉर्ड विभाग : नक्कल काढणे ३० ऐवजी ५० रुपये
– सावेडी जॉगिंग ट्रॅक भाडे : २ हजार ऐवजी १० हजार
– अग्निशमन सेवा : स्टँड बाय ड्युटी – ३ हजार ऐवजी ५ हजार रुपये, ना हरकत, दाखला शुल्क : १५०० ऐवजी ३ हजार रुपये.

प्रस्तावित कचरा संकलन सेवा शुल्क (मासिक) पुढीलप्रमाणे :
निवासी घरे – ३० रुपये, दुकाने व दवाखाने – ४५ रुपये, उपहार गृह, हॉटेल, लॉज, गोदाम, शोरुम (उपकरणे, फर्निचर, ऑटोमोबाईल, इलेट्रॉनिक व इतर) – ८० रुपये, रुग्णालये : ५० खाटापेक्षा कमी – ८० रुपये, ५० खाटापेक्षा जास्त – १२० रुपये, शैक्षणिक, धार्मिक संस्था, वसतिगृह, शासकीय व निमशासकीय कार्यालये – ६० रुपये, मंगल कार्यालय, सभागृह, सिंगल स्क्रीन चित्रपट गृह – ५०० रुपये, खरेदी केंद्र, मल्टिस्क्रीन चित्रपट गृह – १ हजार रुपये, फेरीवाले – ३० रुपये.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये ग्राम महसुल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

  अहिल्यानगर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण (ता. नगर) येथील ग्राम महसुल अधिकारी दिपक साठे यास लाचलुचपत...

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...