spot_img
तंत्रज्ञानलॉन्च झाला Redmi चा 'हा' जबरदस्त Smartphone ! किंमत फक्त दहा हजार,...

लॉन्च झाला Redmi चा ‘हा’ जबरदस्त Smartphone ! किंमत फक्त दहा हजार, पहा जबरदस्त फीचर्स

spot_img

नगर सह्याद्री टीम : मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असणारा Redmi 13C नायजेरियामध्ये लॉन्च झाला आहे. आता ते लवकरच भारतासह इतर मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे. हा स्मार्टफोन अत्यंत कमी किमतीत येणार आहे, यात 50MP प्रायमरी कॅमेरा सेन्सर, Android 13 OS, MediaTek Helio G85 चिपसेट आणि 90Hz HD+ डिस्प्लेसह येतो. चला जाणून घेऊयात Redmi 13C ची किंमत, फीचर्स आणि इतर माहिती –

Redmi 13C जवळपास इतकी असेल किंमत
Redmi 13C हा स्मार्टफोन 4 जीबी / 128 जीबी आणि 8 जीबी / 256 जीबी या दोन मॉडेलमध्ये उपलब्ध होईल. 4 जीबी / 128 जीबी मॉडेलची किंमत अंदाजे 10,200 रुपये तर 8 जीबी / 256 जीबी मॉडेलची किंमत अंदाजे 11,200 रुपये असेल. हँडसेट ब्लॅक आणि क्लोव्हर ग्रीन कलरमध्ये येतो.

Redmi 13C चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
रेडमी 13 सी मध्ये 6.74 इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 720×1600 पिक्सल आहे. डिस्प्लेमध्ये 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट आहे, ज्यामुळे स्क्रॉलिंग आणि गेमप्ले अधिक सुलभ होतो. डिस्प्लेमध्ये नॉच देण्यात आला आहे, यात फ्रंट कॅमेरा आहे. रेडमी 13 सी मध्ये मीडियाटेक हेलियो जी 85 प्रोसेसर आहे. हा एक बजेट-फ्रेंडली प्रोसेसर आहे जो साधी कामे सहजपणे हाताळू शकतो. फोनमध्ये 4 जीबी, 6 जीबी व 8 जीबी रॅम आणि 128 जीबी व 256 जीबी स्टोरेज आहे. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येऊ शकते.

Redmi 13C चा कॅमेरा
Redmi 13C मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 50 एमपी प्रायमरी कॅमेरा, 2 एमपी डेप्थ कॅमेरा आणि 2 एमपी मॅक्रो लेन्स चा समावेश आहे. प्रायमरी कॅमेरा फोटो आणि व्हिडिओसाठी एकदम उत्तम आहे. डेप्थ कॅमेरा बॅकग्राऊंड ब्लर करण्यास मदत करतो, तर मॅक्रो लेन्स जवळून शॉट्स घेण्यासाठी उपयुक्त आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Redmi 13C बॅटरी
Redmi 13C मध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी एका दिवसाच्या वापरासाठी पुरेशी आहे. 18W चार्जरसह, तुम्ही बॅटरी लवकर चार्ज करू शकता. Redmi 13C मध्ये 4G, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ, GPS आणि USB टाइप-सी पोर्ट आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

WhatsApp ने आणले 4 नवीन फीचर्स, एकदा पहाच..

नगर सहयाद्री वेब टीम:- व्हॉट्सॲप आपल्या यूजर्ससाठी रोज नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. नवीन वैशिष्ट्यांची...

महायुतीचे मंत्री ठरले! कोणा कोणाला फोन? वाचा संपूर्ण यादी

मुंबई । नगर सहयाद्री:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा आज रविवारी नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा...

राधाकृष्ण विखे पाटील मंत्रिपदाची शपथ घेणार!, महसूल खाते पुन्हा मिळणार का?

मुंबई । नगर सहयाद्री:- नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील नेत्यांचा शपथविधी पार पडणार आहे. आज...

शिंदेंची टीम फायनल! कुणा कुणाला मंत्रिपद फिक्स; यादी आली…

Maharashtra Politics News: महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानतंर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला...