spot_img
अहमदनगरअहिल्यानगर महापालिकेत लवकरच भरती; किती पदे भरणार पहा...

अहिल्यानगर महापालिकेत लवकरच भरती; किती पदे भरणार पहा…

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
महानगरपालिकेतील तांत्रिक पदांच्या भरतीची प्रक्रिया मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. आर्थिक अडचणींमुळे प्रशासनाने १३० पदांना कात्री लावत केवळ ४५ तांत्रिक पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सामाजिक आरक्षण निश्चितीसाठी पाठवलेला प्रस्ताव नाशिकहून मान्यतेसह महापालिकेला प्राप्त झाला आहे. आता महापालिका स्तरावर खेळाडू, दिव्यांग अशा समांतर आरक्षणाच्या निश्चितीची प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

महापालिकेतील तांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने महापालिकेने तांत्रिक पदांच्या भरतीसाठी आस्थापना खर्चाची अट शिथिल करून परवानगी द्यावी, असा प्रस्ताव नगर विकास खात्याकडे पाठवला होता. त्याला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी देत १७६ पदे भरण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर महानगरपालिकेने १३४ तांत्रिक पदे भरण्याबाबत प्रक्रिया सुरू केली. दरम्यानच्या काळात सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे महापालिकेच्या आस्थापना खर्चात पुन्हा एकदा वाढ झाली.

पगाराचा खर्च दरमहा दोन कोटींनी वाढल्याने महापालिकेने या पदभरतीला कात्री लावत अत्यावश्यक असलेली केवळ ४५ तांत्रिक पदे भरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सामाजिक आरक्षण निश्चितीचा प्रस्ताव तयार करून नाशिक येथे पाठवण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे. आता समांतर आरक्षण निश्चितीसाठी प्रक्रिया सुरू आहे. प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. मान्यतेनंतर भरती प्रक्रियेसाठी टाटा कन्सल्टन्सी या शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेकडे प्रस्ताव दिला जाणार आहे. त्यामुळे लवकरच भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महापालिका वॉर्ड रचनेची प्रतीक्षा संपली; तीन वॉर्डात काय आणि कसे झाले बदल पहा

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता एक हरकत अंशतः मान्य; महानगरपालिकेच्या...

भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय शोकसभेचे आयोजन

अहिल्‍यानगर / नगर सह्याद्री - भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय...

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...