spot_img
ब्रेकिंगRashibhavishya: आजचे राशी भविष्य ! 'या' राशींसाठी खास आहे 'गुरुवार'

Rashibhavishya: आजचे राशी भविष्य ! ‘या’ राशींसाठी खास आहे ‘गुरुवार’

spot_img

Rashibhavishya: आजचे राशी भविष्य ! ‘या’ राशींसाठी खास आहे ‘गुरुवार’

मुंबई । नगर सह्याद्री –

मेष राशी भविष्य

आजच्या दिवशी आपल्या आरोग्याची कसलीही काळजी करण्याची गरज नाही. आपल्या सोभवतालचे लोक आपले मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील. तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धन लाभ करवून देऊ शकते. आपल्या प्रिय व्यक्तीशी भेटवस्तूंची देवघेव करण्यास अतिशय शुभ दिवस आहे.

मिथुन राशी भविष्य

आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

उपाय :- सद्चरित्राचे पालन केल्याने सुर्य प्रसन्न होतो आणि पारिवारिक आयुष्यामध्ये आनंद वाढतो.

सिंह राशी भविष्य

तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. धनाची देवाण-घेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याची वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. तुम्हाला तुमच्या मित्रांची सर्वाधिक गरज असेल तेव्हा ते तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत.

तुळ राशी भविष्य

विनाकारण स्वत:ची निंदा करून तुमचा उत्साह घालवू नका. येनकेन प्रकारे आर्थिक लाभ होतील. आपल्या पालकांचे आरोग्य हा दखल घेण्याचा आणि चिंतेचा विषय असेल. प्रेम जीवनाला उत्तम बनवण्याची इच्छा असेल तर, कुठल्या तिसऱ्या व्यक्तीचे बोलणे ऐकून आपल्या प्रेमी विषयी कुठले ही मत मांडू नका.

धनु राशी भविष्य

संध्याकाळी जरा क्षणभर विश्रांती घ्या. तुमच्या पैशामुळे आज अनेक समस्या निर्माण होतील – तुमचा खर्च खूप अधिक होईल किंवा तुमचे पाकीट हरवेल – निष्काळजीपणामुळे काही तोटा निश्चितपणे होईल. तुम्ही भागीदारांच्या/जोडीदारांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले तर तो/ती असहनशील बनतील.

कुंभ राशी भविष्य

तुमची शारिरीक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. लोकांना नेमके काय हवेय हे समजावून घ्या आणि तुमच्याकडून काय हवे आहे तेही समजून घ्या – परंतु आज खर्च करताना उधळपट्टी करू नका. बहीण आपुलकीने वागल्यामुळे तुम्हाला उत्साह वाटेल.

वृषभ राशी भविष्य

प्रेम, आशा, विश्वास, सद्भावना, आशावादी आणि निष्ठा अशा सकारात्मक भावना स्वीकारण्यासाठी तुमच्या मनाला उद्युक्त करा. एकदा का अशा भावनांनी तुमच्या मनाचा ताबा घेतला की, कोणत्याही परिस्थितीत तुमचे मन आपसूकपणे सकारात्मक विचार करेल.

कर्क राशी भविष्य

मान अथवा पाठीच्या निरंतर वेदनांचा तुम्हा त्रास होण्याची शक्यता आहे. विशेषत: सर्वसामान्य अशक्तपणाबरोबर जर हा त्रास होत असेल तर दुर्लक्ष करू नका. आजच्या दिवशी विश्रांती अत्यंत गरजेची आहे. आर्थिक जीवनात आज आनंद राहील. या सोबतच तुम्ही आज कर्जापासून मुक्त होऊ शकतात.

 

कन्या राशी भविष्य

चार भिंतीबाहेरील उपक्रम तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. बंदिस्त किल्ल्याप्रमाणे स्वत:भोवती सुरक्षित चौकट आखून त्याचाच विचार करण्याची जीवनशैली तुमच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी मारक आहे. तुम्हाला ही जीवनशैली चिंताग्रस्त आणि उदास बनवणारी असते.

वृश्चिक राशी भविष्य

अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. जीवनसाथी सोबत पैश्याने जोडलेल्या कुठल्या मुद्यांना घेऊन आज वाद होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या व्यर्थ खर्चावर तुमचा साथी तुम्हाला लेक्चर देऊ शकतो. तुमच्या खेळकर-खोडकर स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न बनेल.

मकर राशी भविष्य

आज जितके शक्य असेल तितके लोकांपासून दूर राहा. लोकांना वेळ देण्यापेक्षा स्वतःला वेळ द्या. वैवाहिक आयुष्यात वैयक्तिक स्वातंत्र्य हवं असतं, पण आजचा दिवस एकमेकांच्या जवळ राहण्याचा आहे. रोमान्सचा असीम आनंद घेण्यास तयार राहा.

मीन राशी भविष्य

इतरांबद्दल वाईट इच्छा बाळगण्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल. अशा प्रकारचे विचार टाळणे गरजेचे आहे, तुमच्या आयुष्यासाठी ते घातक आहे आणि कार्यक्षमता कमी करणारे आहे. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विधानसभेत गरजला पारनेरकरांचा आवाज! आ. दाते यांनी मांडला ‘तो’ प्रश्न; वेधले शासनाचे लक्ष

पारनेर । नगर सहयाद्री :- पारनेर-नगर मतदारसंघातील सुपा पासून खडकी, खंडाळ्यासह जिल्ह्यातील विविध भागात दि...

श्रीराम चौकातील मावा बनवणाऱ्या कारखान्यांवर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री नगर शहरात सुगंधी तंबाखू आणि मावा तयार करणाऱ्या अवैध कारखान्यांवर अहिल्यानगर...

वातावरण तापलं!  सिद्धार्थ नगरमध्ये राडा; कुटुंबावर हल्ला, प्रकरण काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- सिद्धार्थनगरात तरुणीला छेडछाड केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चार जणांनी फिर्यादी...

रावणवाडीत राक्षसी कृत्य; जन्मदात्या आईचा मुलाने केला ‘मर्डर’

Crime News : खर्चासाठी पैसे न दिल्याने  अल्पवयीन मुलाने आपल्या आईचा गळा घोटून हत्या...