spot_img
राजकारणआ. काळेंच्या विजयाची खात्री, बाकीच्यांची मी जिरवतो..मंत्री विखेंची आता राष्ट्रवादीच्या आ. काळेंसोबत...

आ. काळेंच्या विजयाची खात्री, बाकीच्यांची मी जिरवतो..मंत्री विखेंची आता राष्ट्रवादीच्या आ. काळेंसोबत कोल्हेंविरोधात मोर्चेबांधणी

spot_img

नगर सह्याद्री /अहमदनगर : मागच्या काही दिवसात काळे कोल्हेयांची जवळीक वाढली आहे. परंतु हि जवळीक विखे यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसते. त्यामुळे आता मंत्री राधाकृष्ण विखे यांनी राष्ट्रवादीचे आ. काळे यांना सोबत घेत कोल्हेंविरोधात मोर्चे बांधणी सुरु केल्याचे दिसते.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील गणेश कारखाना निवडणुकीत भाजपच्या विवेक कोल्हे यांनी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे एकत्र आले व त्यांनी विखे यांची सत्ता खाली खेचली. त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकात विखेंचा पराभव करण्यासाठी विवेक कोल्हे यांनी काँग्रेसच्या थोरात यांना बरोबर घेत कंबर कसल्याचे दिसून आले. आता साई कर्मचारी सोसायटीत देखील कोल्हे थोरात एकत्र आले आहेत.

आता राधाकृष्ण विखे पाटलांनी आपला मोर्चा कोपरगाव मतदारसंघात वळवला असून आमदार आशुतोष काळे याना सोबत घेत कोल्हेंच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यांनी काळे यांच्या समवेत विविध विकास कामांचे भूमिपूजन केले. आ. काळे यांना बरोबर घेत त्यांनी मंगळवारी कोपरगाव तालुक्याचा दौरा केला. आता आगामी काळात कोल्हे काय भूमिका घेतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

कोपरगाव तालुक्यात पालकमंत्री विखे यांची सासुरवाडी आहे. त्यांनी कोपरगाव दौऱ्याची सुरुवात आपल्या सासरवाडीतूनच केली. त्यांनी विविध विकास कामांचे भूमिपूजन करत आ. काळे यांचे कौतुक केले. यावेळी ते म्हणाले की, आशुतोष काळे यांनी चांगलं काम कराव, त्यांना जिथे शासनाची मदत लागेल तेथे मी त्यांच्यासोबत राहून त्यांना मदत करेल. तसेच पुढे बोलताना तर विजयाची खात्रीच दिली.

ते म्हणाले, जशी मोदी साहेबांची गॅरंटी तशी माझी तुम्हाला गॅरंटी आहे त्यामुळे आता तुम्ही चिंता करू नका. तसेच ते म्हणाले की, तुम्ही कोणाच्या जिरवायच्या भानगडीत पडू नका, कोणाची जिरवायची हे काम माझ्यावर सोडा असं म्हणत विखेंनी कोल्हेंवर अप्रत्यक्ष टीकाच केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....