spot_img
ब्रेकिंगRashibhavishya: आजचे राशी भविष्य ! 'या' राशींचे स्वप्न सत्यात उतरणार तर 'त्या'...

Rashibhavishya: आजचे राशी भविष्य ! ‘या’ राशींचे स्वप्न सत्यात उतरणार तर ‘त्या’ राशींना झटका बसणार

spot_img

मुंबई । नगर सह्याद्री –

मेष राशी भविष्य
चार भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. जे लोक विवाहित आहे त्यांना आज आपल्या मुलांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. रोमान्ससाठी चांगला दिवस. पगारातील वाढ तुम्हाला उल्हसित करेल. पूर्वीची उदासी आणि तक्रारी दूर सारण्याची हीच खरी वेळ आहे.

मिथुन राशी भविष्य
तुमचा जबरदस्त लवचिकपणा आणि निडरपणा तुमच्या मानसिक ताकद अधिक वाढविणारा ठरेल. कोणतीही परिस्थिती ओढवली तरी अशी खंबीर भूमिका तुम्हाला ती परिस्थिती तुमच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सहाय्यकारी ठरेल. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो.

सिंह राशी भविष्य
तुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही वेळ खर्च करायला हवा. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. मित्रमंडळी मदतीसाठी तत्पर असतील आणि आपणास खरा आधार देतील. प्रिय व्यक्तीला फुले आणि सुंदर भेटवस्तू देऊन संध्याकाळ प्रणयराधनेत घालवाल. जोपर्यंत एखादे काम पूर्ण होण्याची खात्री होत नाही तोपर्यंत कसलेही वचन देऊ नका.

तुळ राशी भविष्य
लहान मुलांबरोबर खेळण्यातून मौज मस्ती करणे हा आपल्या दुखावर चांगला उपाय असेल. आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीकडे तुमच्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठराल. आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील.

धनु राशी भविष्य
आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. आज कुठल्या पार्टीमध्ये तुमची भेट अश्या व्यक्ती सोबत होऊ शकते जे आर्थिक पक्ष मजबूत करण्यासाठी तुम्हाला महत्वाचा सल्ला देऊ शकतो. कुटुंबामध्ये वर्चस्ववादी भूमिका ठेवण्याचा आपला स्वभाव तातडीने बदलण्याची गरज आहे.

कुंभ राशी भविष्य
मौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. तुमचा पैसा तेव्हाच कामाला येईल जेव्हा तुम्ही त्याला संचित कराल ही गोष्ट योग्य प्रकारे जाणून घ्या अथवा येणाऱ्या काळात पश्चाताप करावा लागेल. आपण आपल्या कुटुंबियांची किती काळजी करता हे त्यांना जाणवण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संदेश सतत देत राहा. त्यांच्याबरोबर आपला कीमती वेळ घालवल्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित होईल.

वृषभ राशी भविष्य
मानसिक, नैतिक शिक्षणाबरोबरच शारीरिक शिक्षण घेणेही संपूर्ण विकासासाठी आवश्यक ठरते. सशक्त मन हेच सशक्त शरीरामध्ये वास करते. आज तुम्हाला व्यर्थ खर्च करण्यापासून स्वतःला थांबवले पाहिजे अथवा गरजेच्या वेळी तुमच्या जवळ पैश्याची कमतरता होऊ शकते. सामाजिक कामात रमाल परंतु अन्य लोकांना तुमची गुपिते सांगणे टाळा.

कर्क राशी भविष्य
जुन्या मित्रांबरोबरील भेटीगाठी तुमचा उत्साह द्विगुणित करतील. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. आजच्या दिवशी आपल्या कुंटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रीत करणे ही तुमची प्राथमिकता असेल. तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्या प्रेमामध्ये आज कुणीतरी बिब्बा घालेल. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असलात तरी स्त्री सदस्य तुमच्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील.

कन्या राशी भविष्य
मुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. रटाळ कंटाळवाण्या, त्रासदायक दिवसाचा निरोप घेण्यासाठी, रात्रीच्या जेवणाचा मस्तपैकी प्लॅन करा. मुलांच्या सहवासात तुम्ही आणखीन उल्हसित व्हाल. ही गोष्ट लक्षात घ्या की, दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या कामी येईल म्हणून, आजच्या दिवशी धन संचय करण्याचा विचार बनवा. तुमच्या बेफिकीर वृत्तीमुळे पालक काळजीत पडतील.

वृश्चिक राशी भविष्य
आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे परंतु, या सोबतच तुम्ही दान-पुण्य ही केले पाहिजे कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. प्रेमातून साहचर्य आणि बॉण्डिंग तयार होईल. जर आपल्या लव पार्टनर ला आपला जीवनसाथी बनवण्याची इच्छा आहे तर, त्यांच्याशी आज बोलू शकतात तथापि, बोलण्याच्या आधी तुम्ही त्यांच्या भावनांना जाणून घ्या. गेल्या काही दिवसांपासून कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडथळे निर्माण होत असतील, तर आजचा दिवस मात्र चांगला आहे.

मकर राशी भविष्य
मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील. पण तत्त्वांना शरण न जाता, विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या. अनपेक्षित स्रोतांद्वारे तुमची मिळकत होईल. शेजा-याशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल. परंतु, तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल. तुम्ही भांडणात सहकार्य केले नाही तर तुमच्याशी भांडायला कुणी येणार नाही.

मीन राशी भविष्य
तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या अवतीभवती असलेल्या लोकांना प्रभावित करील. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. मतभेदांमुळे खाजगी नातेसंबंधात फूट पडण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज प्रेमाने भरलेले वातावरण राहील.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...