spot_img
अहमदनगरRashibhavishya:आजचे राशी भविष्य ! आजच्या दिवशी ‘या’ राशींसाठी काहीतरी खास

Rashibhavishya:आजचे राशी भविष्य ! आजच्या दिवशी ‘या’ राशींसाठी काहीतरी खास

spot_img

मुंबई । नगर सह्याद्री –

मेष राशी भविष्य
आरोग्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज निर्माण होईल. व्यापारात मजबुती येण्यासाठी तुम्ही आज काही महत्वाचे पाऊल उचलू शकतात यासाठी तुमचा कुणी जवळचा तुमची आर्थिक मदत करू शकतो. तुम्हाला आपल्या घरातील लहान सदस्यांसोबत वेळ घालवणे शिकले पाहिजे. जर तुम्ही असे केले नाही तर, तुम्ही घरात सद्भाव बनवण्यात यशस्वी होणार नाही. आज तुमच्या जोडीदाराच्या निरागस वागणूकीमुळे तुमचा दिवस खूप सुंदर जाईल.

मिथुन राशी भविष्य
आज महत्त्वाचे निर्णय घेणे तुम्हाला क्रमप्राप्त ठरू शकते. त्यामुळे तुमचा तणाव वाढेल आणि तुम्ही उदासही व्हाल. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. संध्याकाळी अचानक पाहुणे आल्याने घरात गर्दी होईल. आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील ख-या प्रेमाला मुकाल. परंतु चिंता करू नका वेळ येताच प्रत्येक गोष्ट बदलते आणि त्यानुसार तुमचे जीवनही प्रेमाने भरून जाईल.

सिंह राशी भविष्य
तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. जर तुम्हाला वाटते की, तुमच्याकडे पर्याप्त धन नाही तर, आज घरातील कुणी मोठ्या व्यक्तीकडून धन संचित करण्याचा सल्ला घ्या. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे.

तुळ राशी भविष्य
मनावर झालेल्या आघातामुळे तुम्हाला प्रचंड धैर्य आणि शक्ती पणाला लावावी लागेल. तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुम्ही यावर सहजपणे मात कराल. आजच्या दिवशी समोर येणारे गुंतवणुकींचे नवे पर्याय धुंडाळा, पण प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करा. नातेवाईकांच्या भेटीमुळे आजचा दिवस सुखद आणि अनोखा असेल. शारीरिक अस्तित्व हे आता गौण आहे कारण तुम्ही सदासर्वकाळ एकमेकांच्या प्रेमाची अनुभूती घेत आहात. तुमचा/तुमची प्रियकर/प्रेयसी दिवसभर तुमची आठवण काढणार आहे.

धनु राशी भविष्य
तुमच्या चिडण्यामुळे तुम्ही राईचा पर्वत कराल – त्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्य अस्वस्थ होतील. बुद्धिमत्तेच्या जोरावर आपला राग नियंत्रणात ठेवणारे भाग्यवान आत्मे असतात. तुम्ही तुमच्या राग जाळून टाका नाहीतर राग तुम्हाला जाळून भस्मसात करेल. आज घरातून बाहेर जातांना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. खाजगी आयुष्याबरोबरच कोणत्यातरी सामाजिक धर्मादाय कामात स्वत:ला गुंतवा.

कुंभ राशी भविष्य
मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. अनपेक्षित स्रोतांद्वारे तुमची मिळकत होईल. कौटुंबिक जबाबदा-या या तुमच्या डोक्यावर येतील आणि तुमच्या मनावर दडपण येईल. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल – म्हणून तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल. कामच्या ठिकाणी ज्याचे तुमच्याशी फार जुळत नव्हते आज त्या व्यक्तीशी तुमचा सुसंवाद होईल.

वृषभ राशी भविष्य
तुमचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती आज उच्च असेल. जवळच्या नातेवाईकाकडे जाणे आज तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते. तुमच्या बेफिकीर वृत्तीमुळे पालक काळजीत पडतील. नवीन प्रकल्पात हात घालण्याअगोदर तुम्हाला त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे. प्रणयराधना करण्याची भावना जोडिदाराकडून आज अनुभवता येईल. आज तुमचे मन ऑफिसच्या कामामध्ये लागणार नाही.

कर्क राशी भविष्य
क्षणिक आवेगाने कोणताही निर्णय घेण्याची घाई करु नका, आपल्या मुलांसाठी ते त्रासदायक ठरु शकते. पैसे मिळविण्याचा नव्या संधी लाभदायक असतील. दिवसाची सुरुवात गोड बातमीने होईल. नातेवाईक अथवा जवळचे मित्रमंडळी यांच्याकडून आनंदवार्ता मिळेल. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो. स्त्री सहकारी तुम्हाला चांगलं पाठबळ देतील आणि प्रलंबित कामांची पूर्तता करण्यास मदत करतील.

कन्या राशी भविष्य
कामाच्या धबडग्यात मधेमध्ये थोडा आराम करा, विश्रांती घ्या आणि रात्रीची जागरणे टाळा. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धन लाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवणे त्रासाचे ठरेल – परंतु तुमच्या आजुबाजूच्या लोकांना टाकून बोलू नका किंवा तुम्ही एकटे पडाल. प्रणयराधन करण्याच्या आठवणींनी तुमचा दिवस व्यापून राहील.

वृश्चिक राशी भविष्य
तुमची प्रकृती आणि तुमचे दिसणे सुधारण्यासाठी आज तुम्हाला भरपूर वेळ काढता येईल. दीर्घकालीन, प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रीणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. तुम्ही भागीदारांच्या/जोडीदारांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले तर तो/ती असहनशील बनतील. प्रियाराधनाचे विचारांनी ग्रासाल आणि पूर्वी पाहिलेल्या स्वप्नात रमून जाल. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल.

मकर राशी भविष्य
वाद, संघर्ष टाळा, अन्यथा तुमच्या आजारात भर पडेल. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात. प्रभावी ठरणाºया आणि महत्त्वाच्या पदांवरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल. तुमच्या प्रेमजीवनात आजच्या दिवशी तुमच्यासाठी काहीतरी खास मिळणार आहे.

मीन राशी भविष्य
आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल – तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. आज कुणी न सांगता एक देणेदार तुमच्या अकाऊंट मध्ये पैसे टाकू शकतो हे पाहून तुम्हाला आनंद ही होईल आणि आश्चर्य वाटेल. तुमच्या खेळकर-खोडकर स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. आपल्यावर प्रेम करणा-या व्यक्तीच्या निष्ठेवर शंका घेऊ नका.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...