spot_img
अहमदनगरपारनेर तालुका जैन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी राजेश भंडारी, उपाध्यक्ष पदी प्रसाद कर्नावट

पारनेर तालुका जैन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी राजेश भंडारी, उपाध्यक्ष पदी प्रसाद कर्नावट

spot_img

जैन महासंघाची तालुका कार्यकारणी घोषित
पारनेर / नगर सह्याद्री –
तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील रहिवासी व नगर येथील महावीर उद्योग समुहाचे उद्योजक राजेश भंडारी यांची जैन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी खडकवाडी येथील प्रसाद कर्नावट यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पारनेर तालुक्यातील या जैन संघटनेच्या अध्यक्षपदी व उपाध्यक्ष पदी सामाजिक व राजकीय घडामोडीतील दोन तरूणांना पहिल्यांदा संधी मिळाली आहे.

रविवारी महावीर जयंती निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात व बैठकीत ही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. पारनेर तालुका जैन महासंघ अध्यक्ष उपाध्यक्ष व इतर कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून पारनेर तालुका जैन महासंघाचा अध्यक्षपदी राजेशजी संतोष भंडारी, उपाध्यक्ष पदी प्रसाद कर्नावट, उपाध्यक्ष प्रदिप गांधी, सचिव पदी सचिनजी कुंदनलालजी साखला, खचिनदार पदी विलासजी कटारिया, सरचिटणीस पंकजजी पिपाडा, सोशलमिडीया समन्वय यशजी लोढ़ा, यांची निवड झाली.

पारनेर तालुक्यतील सर्व ४६ गावांचे जैन संघटणेचे अध्यक्ष उपस्थित होते. जैन समाजाच्या वतीने सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या नवनिर्वाचीत पदाधिकारी यांचे संस्थानपक अध्यक्ष कुंदनकाका साखला यांचा हस्ते सर्व गावांचे जैन संघटनेच्या वतीने नवनिर्वाचीत पदाधिकारी सत्कार करण्यात आला.

तालुकाध्यक्ष पदी पिता – पुत्रांना संधी..
महावीर जयंतीचे औचित्य साधून पारनेर तालुका जैन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी राजेश भंडारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या अगोदर राजेश भंडारी यांचे वडील संतोष भंडारी यांना पण या पदावर अनेक वर्षे काम करण्याची संधी मिळाली होती. एक समाजाभिमुख व दिलदार नेतृत्व म्हणून समाजात राजेश भंडारी यांचा नावलौकिक असुन जैन समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भंडारी यांनी सांगितले तर या महासंघाच्या माध्यमातून सामाजिक व आरोग्य रक्तदान शिबीरासह इतर सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे राजेश भंडारी यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडकी बहीण योजनेतून पाच लाख महिला अपात्र; कारण आलं समोर..

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. लाडकी...

स्व. वसंतराव झावरे यांची स्वप्ने पूर्ण करणार; कोण काय म्हणाले पहा…

आ. काशीनाथ दाते | वासुंदे येथे स्व. आ. वसंतराव झावरे पाटील यांच्या पुण्यस्मरणनिमित्त कार्यक्रम पारनेर...

‘त्यांना’ दिल्लीच्या जनतेने जागा दाखविली; मंत्री विखे पाटील

लोणी | नगर सह्याद्री भारतीय जनता पक्षाने दिल्लीच्या विधानसभेत मिळविलेला एैतिहासिक विजय विचारांचा आणि विकासाचा...

…म्हणुन दोन गटांत राडा; ‘असा’ घडला नको तोच प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शेतजमिनीच्या वादातून दोन गटांत मारहाण झाल्याची घटना शिंगवे नाईक शिवारात बुधवारी...