spot_img
देशLok Sabha Election: राज ठाकरेंची दिल्लीत एंट्री! महायुतीला आता इंजिन जोडलं जाण्याची...

Lok Sabha Election: राज ठाकरेंची दिल्लीत एंट्री! महायुतीला आता इंजिन जोडलं जाण्याची शक्यता?

spot_img

Lok Sabha Election: भाजप आणि मनसेच्या युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः दिल्लीला दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीसह आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीवरही फैसला होईल. विशेष म्हणजे भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीसाठी फडणवीसही दिल्लीत दाखल झालेत. त्यामुळे भाजप-मनसे युतीसह मनसेला महायुतीत घेण्यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल.

मनसेला सोबत घेण्यासाठी काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतील लोकसभेची १ जागा देऊन आणि इतर बादाघाटी करून मनसेला सोबत घेण्यावर भाजपची चर्चा सुरू आहे. दक्षिण मुंबईची जागा मनसेला देऊन त्यांना महायुतीत घेण्यावर शिक्कामोर्तब होईल. दक्षिण मुंबईत सध्या ठाकरे गटाचे अरविंद सावंत खासदार असून मनसेकडून बाळा नांदगावकर महायुतीचे उमेदवार असू शकतात.

राज ठाकरे यांची अमित शहा यांच्यासमवेत बैठक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे विशेष विमानाने काल दिल्लीला ९.४० वाजेच्या दरम्यान दाखल झालेत. राज ठाकरेंसोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरेही आहेत. विशेष म्हणजेच गेल्या ३-४ दिवसांतला राज ठाकरेंचा हा दुसरा दिल्ली दौरा आहे, केंद्रीय मंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत ही बैठक भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात होत आहे. या बैठकीत राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र येथील जागावाटपांचा निर्णय होणार आहे. महाराष्ट्रातील जागावाटपांचा तिढा सोडवण्यात येणार आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...