spot_img
महाराष्ट्रराज का रण ! लोकसभेसाठी मनसेचा मोठा प्लॅन, राज ठाकरे यांची सभा...

राज का रण ! लोकसभेसाठी मनसेचा मोठा प्लॅन, राज ठाकरे यांची सभा अन् ‘या’ चार जागा जिंकण्याचा विश्वास

spot_img

नगर सहयाद्री / मुंबई : लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. सर्वच पक्ष आता तयारीला लागले आहेत. आता मनसेने देखील दंड थोपटले आहेत. मनसेने आता विदर्भात लक्ष केंद्रित केले आहे. येथे घवघवीत यश मिळेल असे देखील मनसेनं म्हटलं आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे विदर्भात सभा घेणार असून ताकदीनिशी ते लढतील. येत्या काळात मनसे ही निवडणूक कशी लढणार याचा प्लॅन मनसे नेते राजू उंबरकर यांनी सांगितला आहे. मनसे नेते राजू उंबरकर यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की, आम्हाला लोकसभा निवडणूक जिंकण्याचा विश्वास आहे. विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चार लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढणार असून या चार जागा मनसे जिंकेल अस उंबरकर म्हणालेत.

या मतदारसंघामधून लढणार मनसे 
चंद्रपूर-वणी लोकसभा मतदारसंघ, वाशिम लोकसभा मतदारसंघ, अमरावती आणि बुलढाणा मतदारसंघात मनसे आपले उमेदवार देणार आहे, असं उंबरकर म्हणालेत. काँग्रेसकडे असलेल्या चंद्रपूर – वणी लोकसभा मतदारसंघासाठी मनसेनं कंबर कसली आहे. खासदार भावना गवळी यांच्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातंही मनसे निवडणूक लढणार आहे. अमरावती आणि बुलढाणा मतदारसंघातही लढण्याची मनसेची तयारी आहे, असं राजू उंबरकर यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांची सभा गाजणार
लोकसभा निवडणूक प्रचारात राज ठाकरे यांच्या सभा पुन्हा गाजतील असे चित्र आहे. राज ठाकरे आपल्या भाषणाने विरोधकांचे वाभाडे काढतात व त्यांच्या अशाच स्टाईलमधील भाषणामुळे विरोधकांचे धाबे तर दणाणतातच पण लोकांनाही त्या भावतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

फूटपाथवर झोपलेल्या तीन जणांचे डोळे पुन्हा उघडलेच नाही?; भरधाव डंपरने चिरडलं!

Accident News: रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्याच्या वाघोली परिसरात भरधाव वेगाने आलेल्या एका डंपरने फूटपाथवर...

सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला; कारण काय?

Allu Arjun: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या घराबाहेर उस्मानिया विद्यापीठाच्या ज्वाइंट अॅक्शन कमिटीच्या सदस्यांनी रविवारी...

नगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी कधी मिळणार?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांना प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत...

आजचे राशी भविष्य! कुठल्या राशींसाठी आजचा दिवस लाभदायक? वाचा सविस्तर..

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य सोनेरी दिवसांच्या बालपणीच्या रम्य आठवणीत रंगून जाल....