spot_img
अहमदनगरअबब ! आमदार नीलेश लंके यांचा जनता दरबार अन तब्बल 'इतकी' कामे...

अबब ! आमदार नीलेश लंके यांचा जनता दरबार अन तब्बल ‘इतकी’ कामे लागली मार्गी

spot_img

जनता दरबारात १२७ तक्रारी | ५५९ अपंगांना प्रमाणपत्रांचे वाटप

पारनेर | नगर सह्याद्री

आमदार नीलेश लंके यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये पार पडलेल्या जनता दरबारात १२७ तक्रारी दाखल झाल्या. त्यावर चर्चा करण्यात येउन ही कामे मार्गी लावण्यात येतील अशी ग्वाही संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. दाखल तक्रारींपैकी काही तक्रारींवर तात्काळ निर्णयदेखील देण्यात आले.

महसूल, महावितरण, रोजगार हमी योजनेचे अनुदान, कृषी विभाग, आदींबाबात तालुक्याच्या विविध भागांमधील नागरिकांना मंगळवारी तक्रारी दाखल केल्या. त्याबाबत आ. लंके यांनी संबंधित अधिकार्‍यांकडे त्या त्या व्यक्तींच्या कामांना होत असलेल्या विलंबाबात विचारणा केली. एकाही व्यक्तीचे काम प्रलंबित राहणार नाही याची काळजी घ्या व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सुचना आ. लंके यांनी यावेळी अधिकार्‍यांना दिल्या.

यावेळी तहसिलदार गायत्री सैंदाणे, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, नगराध्यक्ष नितीन आडसूळ जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ बाळासाहेब कावरे, सभापती योगेश मते, भूषण शेलार, संदीप चौधरी, अ‍ॅड. राहुल झावरे, रविंद्र राजदेव, विजय डोळ, रायभान औटी, चंद्रभान ठुबे, बाळासाहेब खिलारी, अभयसिंह नांगरे यांच्यासह कृषी, महावितरण, पंचायत समिती, आरोग्य विभागासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अपंग बांधवांच्या अपंग प्रमाणपत्रासंदर्भात यापूर्वी आ. लंके यांच्या पुढाकारातून पारनेर येथील ग्रामीण रूग्णालयात विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी सबंधित अपंगांची तपासणी करून नोंदी घेतल्या होत्या. त्यापैकी ५५९ अपंगांची प्रमाणपत्र आरोग्य विभागाने तयार केली.

त्याचे वितरण यावेळी आ. लंके यांच्या हस्ते करण्यात आले. नीलेश लंके अपंग कल्याणकारी सेवाभावी संस्थेेचे सुनील करंजुले व सुनिता करंजुले यांनी अपंग बांधवांच्या या प्रमाणपत्रांसाठी विशेष परिश्रम घेतल्याचे आ. लंके यांनी यावेळी आवर्जुन सांगितले. यावेळी कृषि विभागामार्फत वितरीत करण्यात येणारे गोपीनाथ मुंडे अपघात अनुदानाच्या धनादेशाचे आ. नीलेश लंके यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनो प्रत्येकी दिड लाखांची मदत देण्यात आली.

विविध विभागांच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीमध्ये दरमहा जनता दरबाराचे आयोजन करण्यात आल्यामुळे नागरिकांची विविध कामे एकाच वेळी व एकाच ठिकाणी मार्गी लावण्यात यश येते. आपण आमदार झाल्यानंतर लगेच जनता दरबार सुरू करून नागरीकांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य दिले होते. मात्र त्यानंतर कोरोना महामारीमुळे जनता दरबार बोलविणे शक्य झाले नाही. आता दरमहा जनता दरबाराचे आयोजन करण्यात येउन पूर्वीप्रमाणेच तालुक्यातील जनतेचे विविध प्रश्न मार्गी लावण्यात येतील.

– नीलेश लंके, आमदार

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप’

निघोज । नगर सहयाद्री जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब...

अहमदनगर ब्रेकिंग! तलाठी आणि मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात! ‘असा’ लावला सापळा

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत तलाठी आणि मंडल अधिकारी...

कांद्याची महाबँक: उल्लू बनविणारा प्रयोग!अभिनव बँक, हिंदुस्थान अ‍ॅग्रो अन् शार्क माशाच्या नावाखाली भारत ढोकणेने कोट्यवधी कमावले अन् गोरगरीबांना गंडवले

अभिनव बँक, हिंदुस्थान अ‍ॅग्रो अन् शार्क माशाच्या नावाखाली भारत ढोकणेने कोट्यवधी कमावले अन् गोरगरीबांना...

बागुल पंडुगू सण तुम्हा माहित आहे का? नगरमध्ये केला जातो उत्साहात साजरा

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर शहरात बागुल पंडुगू सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील तोफखाना...