मुंबई। नगर सहयाद्री-
राज्यात अवकाळी पावसाचं सत्र काही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीये. सध्या वायव्य राजस्थानमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव जाणवत आहे. त्यामुळे उत्तरेतील राज्यात मुसळधार पावसासह गारपीट होत आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असून राज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाची हजेरी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट चालून आलं असून पुढील दोन ते तीन दिवसांत विदर्भात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार असून विदर्भात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.