नगर सह्याद्री टीम
भिजवलेले शेंगदाणे शरीरासाठी महत्वपूर्ण असून डोळ्यांसाठी आणि मेंदूसाठी खूप महत्वाचे असतात. सकाळी उठल्याबरोबर शेंगदाणे खाल्ले की स्मरणशक्ती उत्तम राहण्यास मदत होते. डोळ्यांचा कमकुवतपणा दूर होणे व डोळ्यांवरील ताण दूर करण्यास भिजवलेले शेंगदाणे खाल्लेले चांगले असतात.
ब्रेकफास्टमध्ये तुम्ही पौष्टिक काही खाल्लंत तर तुमच्या शरीराला त्याचा फायदा होतो. तसेच तुम्ही नाश्त्यामध्ये भिजवलेले शेंगदाणे खाल्ले तर त्याचे शरीराला खूप फायदे होतात. शेंगदाण्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असल्याने ते पदार्थ पचनासाठी उत्तम मानले जातात. सुक्या शेंगदाण्या ऐवजी ते शेंगदाणे रात्रभर भिजत ठेऊन खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते.
भिजवलेले शेंगदाणे डोळ्यांसाठी आणि मेंदूसाठी खूप चांगले असून स्मरणशक्ती चांगली व्हावी यासाठी तुम्ही भिजवलेले शेंगदाणे खाऊ शकता. रोज भिजवलेल्या शेंगदाण्याचे सेवन केल्याने त्वचेची चमक वाढते व चमकदार बनण्यास मदत करते. तुमच्या चेहऱ्यावर जर मुरूम असेल तर भिजवलेले शेंगदाणे खा हे अत्यंत फायदेशीर आहेत.