spot_img
अहमदनगरAhmednagar: हातभट्ट्यांवर संक्रात, देशी विदेशींचे काय?

Ahmednagar: हातभट्ट्यांवर संक्रात, देशी विदेशींचे काय?

spot_img

चार ठिकाणी छापेमारी | सव्वालाखांची हातभट्टी नष्ट
सुनील चोभे | नगर सह्याद्री – 
नगर तालुका पोलिस ठाण्याचे कारभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी पदभार स्विकारताच तालुक्यातील अवैध धंद्यावर हातोडा मारण्याचे काम सुरु केले आहे. त्यांनी खडकी, खंडाळा परिसरातील हातभट्ट्यांवर छापेमारी करीत सुमारे एक लाख ३१ हजार रुपयांची दारु नष्ट केली आहे. मात्र तालुक्यातून जाणार सर्वच महामार्गांवर देशी-विदेशी दारु विक्री करणार्‍या अवैध धंद्यावर कुठलीच कारवाई होताना दिसत नाही, याबाबत नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नगर तालुका पोलिसांनी हातभट्टी चालकांवर केलेल्या छापेमारीमुळे अवैध धंदेचालकांची धाबे दणाणली आहेत. पोेलिसांनी टाकलेल्या छाप्यात युवराज गिरे (खंडाळा), पोपट गिरे (खंडाळा), अशोक पवार (खडकी), राणी पवार (खडकी) यांच्यावर कारवाई करुन मुद्देमाल नष्ट केला आहे.

शनिवारी सकाळी टाकलेल्या छाप्यात युवराज गिरे याच्याकडे ७० हजार रुपयांची गावठी दारु तयार करण्याचे कच्चे रसायन मिळाले, पोपट गिरे याच्याकडे ४२ हजार रुपयांचे रसायन मिळाले, पवार यांच्याकडे १९ हजार रुपयांचे कच्चे रसायन व साहित्य मिळून आले. ते पोलिसांनी जागीच नष्ट केले. मात्र तालुका पोलिस प्रशासनाच्या आशिर्वादावर ठिकठिकाणची अवैध धंदे मात्र जोमात सुरु आहेत. त्यांचे काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, पोलीस अमलदार राजू खेडकर, जयदत्त बांगर, विजय साठे, आदी कर्मचार्‍यांच्या पथकाने केली

तालुक्यातील अवैध धंदे तेजीत
गेल्या काही दिवसांपासून नगर तालुक्यातील अवैध धंद्यांनी जोर धरला आहे. याकडे पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे. तालुक्याचा पदभार घेताच सहाय्यक पोलिस निरीक्षक गिते यांनी अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. असे असले तरी तालुक्यातील वाढलेले अवैध धंदे, मटका, जुगार, दारु, गुटखा, सावकारी, गौण खनिज तस्करी गिते यांच्या काळात तरी बंद होतील का? असा प्रश्न नारिकांना पडला आहे. अवैध धंदे बंदसाठी गिते कोणती मोहिम हाती घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...