spot_img
अहमदनगरश्रीगोंदा नगरपरिषदेमध्ये ‌‘पुष्पाराज‌’!; नागरिक वेटिंगवर, प्रशासक सेटिंगवर

श्रीगोंदा नगरपरिषदेमध्ये ‌‘पुष्पाराज‌’!; नागरिक वेटिंगवर, प्रशासक सेटिंगवर

spot_img

श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्रीगोंदा नगरपरिषदेमध्ये नागरिकांच्या हिताचे कामे होत नसून फक्त स्वहिताचे काम होत आहे. कामासाठी आलेले नागरिक वेटिंगवर ठेवले जात असून प्रशासकांचे लक्ष फक्त आर्थिक सेटिंगवर आहे. यामुळे श्रीगोंदा नगरपरिषदेमध्ये पुष्पाराज सुरु असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दक्ष नागरिक फाउंडेशनचे दत्ताजी जगताप, श्रीरंग साळवे यांनी केला आहे.

श्रीगोंदा नगरपरिषद मधील नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने प्रशासक कामकाज पाहत आहेत. यामुळे सध्या एकहाती कारभार आहे. नगरसेवक नगरपरिषदेच्या कार्यालयात फिरकत नाहीत. यामुळे नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कार्यालयातील कर्मचारी चहापान व टाइमपास वर वेळ खर्च करत आहेत. त्यांना नागरिकांच्या कामास वेळ मिळत नाही. अशी परिस्थिती असताना दररोज नियमितपणे शुद्ध पिण्याचे पाणी देण्याचे वचन नगरपरिषदेचे असताना 365 दिवसांची पाणीपट्टी मागणारी नगरपरिषद दिवसा आड पाणीपुरवठा करत आहे. शहरातील अनेक पेठांचे पथदिवे बंद आहेत.

कचरा उचलणाऱ्या घंटागाड्या दररोज येणे आवश्यक असताना पाच पाच दिवस शहरात फिरकत नाहीत. डासांचा शहरात सुकाळ असताना धूर फवारणी होत नाही. असे एकना अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. प्रशासकांच्या भेटीला आलेले नागरिकांना बसण्यासाठी कोणतीही आसन व्यवस्था नगरपालिकेतील प्रशासकांच्या दालनासमोर नाही. नगरपरिषदेचा येणाऱ्या नागरिकांना तासंतास उभे रहावे लागत आहे. तसेच नगरपरिषदेची पाणीपट्टी मालमत्ता कर, वृक्ष कर, शिक्षण कर असे एक ना अनेक कर नागरिक भरत असल्यानेच कर्मचाऱ्यांचे पगार होऊन त्यांच्या कुटुंबाचा चारिथार्थ चालतो. परंतु नागरिकांच्या समस्यांचा विसर कर्मचारी वर्ग व प्रशासक यांना पडलेला दिसत आहे असे जगताप व साळवे यांनी आरोप करतांना म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरच्या बिग बॉस बारवर छापा; पत्र्याच्या शेडमध्ये ‘तसला’ कारभार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर-कल्याण रस्त्यावरील हॉटेल दिपाली येथे बिग बॉस नावाने अवैधरित्या सुरू...

२ स्कॉर्पीओ, २ गावठी कट्टे, आठ जणांचा खतरनाक प्ल्यान; तितक्यात पोलिसांचा छापा…

Crime News: पैठण येथून शेवगाव येथे काही अट्टल आरोपी येणार असल्याची माहिती शेवगाव पोलिसांना...

आजचे राशी भविष्य ‘या’ राशीतील व्यापाऱ्यांना होणार घाटा; तुमच्या राशीत काय? वाचा सविस्तर

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाºया...

डोनाल्ड टॅम्प यांनी फोडला टॅरिफ बॉम्ब, शेअर बाजारात भूकंप, घडले असे…

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफची घोषणा केली...