spot_img
ब्रेकिंगनगरात भाईगिरी काही थांबेना; मुलावर धारदार शस्त्राने हल्ला

नगरात भाईगिरी काही थांबेना; मुलावर धारदार शस्त्राने हल्ला

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्ता, वाणीनगर कमानी जवळ एका अल्पवयीन मुलावर (वय 17) धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्ल्‌‍यात तो जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याने उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून सहा जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोरख मच्छिंद्र सुद्रीक (रा. बोल्हेगाव), दीनेश शिंदे (पूर्ण नाव माहित नाही, रा. पंचवटी, अहिल्यानगर), प्रणव उर्फ बबलू मोकासे (रा. मोकासे वस्ती, सावेडी), सचिन गोरे (पूर्ण नाव माहित नाही, रा. वाणीनगर, सावेडी) व दोन अनोळखी इसम यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मुलगा पाईपलाईन रस्ता, लेखानगर येथे राहत असून, सध्या तो इयत्ता 10 वीमध्ये शिक्षण घेत आहे. 29 मार्च रोजी तो एका व्यक्तीला सोडण्यासाठी दुचाकीवरून पाईपलाईन रस्ता, वाणीनगर कमानी जवळ गेला होता.

याच वेळी, त्याचा आत्या भाऊ तेथे उपस्थित होता. त्याचा काही संशयित आरोपींशी वाद असल्याने, त्याचा राग काढण्यासाठी फिर्यादीवर हल्ला करण्यात आला. गोरख सुद्रीक याने हातात फायटरसारखी वस्तू घेऊन त्याच्या तोंडावर, नाकावर आणि डोक्यावर मारले. धारधार शस्त्राने त्याच्या डाव्या डोळ्याच्या खाली गंभीर जखम केली. दीनेश शिंदे याने खोऱ्याच्या दांड्याने मारहाण केली. प्रणव मोकासे याने फायटरने मारहाण केली. सचिन गोरे आणि इतर दोघांनी दुचाकी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला तसेच लाकडी दांडक्यांनी मारहाण केली. हल्लेखोरांनी शिवीगाळ करत तुझ्या आत्याभावाला बोलव, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.

एका व्यक्तीने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. फिर्यादी गंभीर जखमी झाल्याने जमिनीवर कोसळले. घटनास्थळी उपस्थितांनी त्याच्या वडिलांना माहिती दिली. त्यानंतर, त्याला तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस अधिक तपास करीत आहेत

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा प्रभाग रचनेबाबत महत्वाचे आदेश प्राप्त; सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना, असा आहे कार्यक्रम

सुनील चोभे | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाने...

‌‘सेनापती बापट‌’ मध्ये गैरव्यवहार! चेअरमनसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल

पारनेर | नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील 75 वषय शेतकरी आणि विमा...

नगर, श्रीगोंदा, शेवगाव,पाथर्डीत तुफान वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

पिकांचे नुकसान | शेड, घराची पत्रे उडाली | जेऊर, चिचोंडी पाटील, खडकीत नुकसान अहिल्यानगर...

‌‘रयत‌’चे विध्यार्थी गिरवणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे धडे: चेअरमन चंद्रकांत दळवी

कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत शिक्षण देणारी राज्यातील पहिली शिक्षण संस्था ‌‘रयत‌’ ठरणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री आर्टिफिशियल...