spot_img
अहमदनगरअहमदनगर जिल्ह्यासाठी अभिमानस्पद ! पुणेवाडीमधील काळभैरवनाथ देवस्थानाचा क वर्गात समावेश, मंत्री विखेंनी...

अहमदनगर जिल्ह्यासाठी अभिमानस्पद ! पुणेवाडीमधील काळभैरवनाथ देवस्थानाचा क वर्गात समावेश, मंत्री विखेंनी केली ‘ही’ घोषणा

spot_img

पारनेर / नगर सह्याद्री :
आघाड्यांचा खेळ फार काळ टिकत नाही. त्यामुळे देशात कितीही पक्ष एकत्रित आले तरी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनता पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पाठबळ देईल असा विश्वास महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी पुणेवाडीचे ग्रामदैवत काळभैरवनाथ देवस्थानाचा क वर्गात समावेश करण्याचे जाहीर केले.

पारनेरमधील पुणेवाडी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या पुणेवाडी फाटा ते पुणेवाडी रस्त्याच्या सुमारे २ कोटी रुपयांच्या कामांचा प्रारंभ ३३ /११ के.व्ही.विद्युत केंद्राचे लोकार्पण मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी विश्वनाथ कोरडे, काशिनाथ दाते, सिताराम खिलारी, भाजपाचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, आश्विनी थोरात, सरपंच बाळासाहेब रेपाळ, उपसरपंच सुहास पुजारी उपस्थित होते.

याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी ग्रामीण भागाच्या विकासाला केंद्र सरकार कडून मिळत असलेल्या निधीतून ग्रामीण भागाच्या विकासाचे नवे चित्र समोर येत आहे. संपूर्ण देश आज बदलत आहे. अन्य देशाच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांवर आली असल्याकडे लक्ष वेधून मोदीजीच्या योजनेचा लाभ देशातील प्रत्येक माणसाला मिळत असल्याचे सांगितले.

कोव्हिड संकटात संपूर्ण जग थांबले होते. तेव्हा आपल्या प्रधानमंत्र्यानी देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची योजना सुरू केली. या योजनेला २०२९ पर्यत मुदतवाढ दिली असल्याचे स्पष्ट करून असंघटीत कामगारांना जेवण आणि इतर योजनांमधून त्यांचे अधिकार त्यांना केंद्र सरकारने दिले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

प्रधानमंत्री आवास योजनेची व्याप्ती आपल्याला वाढवावी लागणार असून गायरान जमीनीची उपलब्धता असेल आणि तशी मागणी आल्यास घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली. पुणेवाडीचे ग्रामदैवत काळभैरवनाथ देवस्थानाचा क वर्गात समावेश करण्याचे जाहीर करतानाच अतिवृष्टीमध्ये नूकसान झालेल्या ४४ हजार शेतकऱ्यांना ४० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले असून राहीलेल्या शेतकऱ्यांना ७ कोटी रूपये तातडीने देण्याचे आश्वासन विखे पाटील यांनी दिले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...