spot_img
अहमदनगरनगरमध्ये चाललंय काय? बंगल्यात वेश्या व्यवसाय; पोलिसांचा छापा, पाच जणांवर कारवाई

नगरमध्ये चाललंय काय? बंगल्यात वेश्या व्यवसाय; पोलिसांचा छापा, पाच जणांवर कारवाई

spot_img

संगमनेर । नगर सहयाद्री:-
संगमनेर शहरात पोलिसांनी एकाच वेळी दोन वेश्या व्यवसायांवर छापे टाकले. यात पहिला छापा शारदा बेकरी निर्मलनगर परिसरात आणि दुसरा छापा राजापूर रस्ता घुलेवाडी परिसरात टाकला. यात व्यवसाय चालविणाऱ्या दोन महिला आणि एक पुरूष तसेच ग्राहक म्हणून आलेले हिवरगाव पावसा आणि पिंपळ गाव निपाणी येथील एक तरुण अशा पाच जणांवर गुरुवारी (दि. २४) रात्री १०.३० वाजेच्या सुमारास कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही धडक कारवाई केली.

अधिक माहिती अशी, की शारदा बेकरी निर्मलनगर परिसरात एक महिला वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी एक पथक तयार केले आणि बनावट ग्राहक पाठवून शरीरसुखासाठी एका महिलेची मागणी केली. त्यानंतर आरोपी महिला हिने ठरल्याप्रमाणे रक्कम ताब्यात घेत ली आणि एका पीडित महिलेस ताब्यात दिले. याचवेळी पोलीस आत घुसले असता त्यांनी आपली ओळख सांगितली आणि संबंधित ठिकाणाची झडती घेतली. तेव्हा तेथे पिंपळगाव निपाणी (ता. अकोले) येथील एक तरुण ग्राहक म्हणून मिळून आला. पोलिसांनी येथून ६१ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

दरम्यान, घुलेवाडी परिसरात राजापूर रस्त्यावर एका बंगल्यात देखील वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तेथे देखील बनावट ग्राहक पाठविले. तेथे दोघेजण व्यवसाय करत असल्याचे दिसले. जेव्हा पोलिसांनी छापा टाकला तेव्हा तेथे हिवरगाव पावसा येथील एक तरुण मिळून आला. तर, एक पीडित महिला देखील संबंधित बंगल्यात मिळून आली. येथून पोलिसांनी ३१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या दोन्ही कारवाई प्रकरणी शहर पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला तर दोन पीडित महिलांची सुटका केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘मेलो तरी मुंबई सोडणार नाही..; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, वाचा सविस्तर

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. कोर्ट आणि पोलिसांनी नोटीस...

आजचे राशी भविष्य! बाप्पा ‘या’ राशींना देणार आशीर्वाद; कोणाला मिळणार भाग्याची साथ..

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आपल्या उदार वागण्याचा फायदा मित्रमैत्रणींना घेऊ देऊ...

जरांगेंसह मराठ्यांच्या रोषाचे धनी देवेंद्र फडणवीस?

आंदोलनाची व्याप्ती वाढत चालल्याने देवाभाऊंसह गृहखात्याची संपूर्ण यंत्रणा सपशेल अपयशी | जरांगे पाटलांची मुख्य...

‘आंदोलनाला परवानगी दिलीच कशी?’ हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल, कोर्टात नेमकं काय घडलं? दिला मोठा आदेश

मुंबई / नगर सह्याद्री - Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी मुंबईत आझाद मैदान येथे मनोज...