spot_img
ब्रेकिंगप्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांची परीस स्पर्श योजनेवर निवड

प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांची परीस स्पर्श योजनेवर निवड

spot_img

पारनेर / नगर सह्याद्री : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांनी टाकळी ढोकेश्वर येथील श्री ढोकेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रंगनाथ आहेर यांचे परीस स्पर्श योजनेत जिल्हास्तरीय अध्यक्ष म्हणून नामनिर्देशन केले.

राज्यातील नॅक व एनबीए मूल्यांकन न झालेले महाविद्यालये व परिसंस्थांचे नॅक व एनबीए मूल्यांकन करून घेण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने परिस स्पर्श योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परीस स्पर्श योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने विद्यापीठ व जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे संचालक डॉ. संजय ढोले यांच्याकडून डॉ. आहेर यांना हा नेमणूक आदेश पाठविण्यात आला. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर या महाविद्यालयांने देशात आणि राज्यात मिळविलेले सर्वप्रथम यश, राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी याबद्दल त्यांची निवड केली आहे.

या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त, प्राध्यापक व शिक्षणप्रेमींनी डॉ. आहेर यांचे अभिनंदन केले. टाकळी ढोकेश्वर परिवारातर्फे प्राचार्य आहेर यांचे अभिनंदन करण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी की लुटण्यासाठी?; आमदार जगताप यांचा सवाल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: - शहरातील कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोऱ्या दरोडे महिलांच्या...

शहर विकासाच्या आड मनपाच्या टीपीची किड!

पालकमंत्री विखे पाटलांनी स्वतंत्र बैठक घेण्याची गरज | आ. जगताप यांच्या विरोधात जनमत तयार...

सत्ताधारी पुरोगामी मंडळाला मोठा धक्का! परिवर्तन मंडळाचा २१ जागांवर विजय..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने २१ जागांवर मुसंडी...

कार्यकर्त्यांची फौज अन्‌‍ जीवाला जीव देणाऱ्या निष्ठावंतांचं केडर जपणारे ‘अरुणकाका’

सारिपाट / शिवाजी शिर्के नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलेल्या अरुणकाका जगताप यांनी पुढे जाऊन काही...