spot_img
अहमदनगरAhmednagar News : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शनिचरणी लीन

Ahmednagar News : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शनिचरणी लीन

spot_img

Ahmednagar News : अहमदनगर/ नगर सह्याद्री : महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू [President Draupadi Murmu] यांनी आज शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेत मनोभावे पुजा केली. यावेळी राष्ट्रपतींनी श्री शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेकही केला.

यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.

राष्ट्रपतींचे श्री शनैश्वर मंदिरात आगमन झाल्यावर त्यांनी शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेतले व उदासी महाराज मठात त्यांनी अभिषेकही केला. अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींचा सत्कार केला.

श्री शनिशिंगणापूर संस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर, उपाध्यक्ष विकास बनकर, कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदळे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शनिदेवाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान केला. श्री शनैश्वर मंदीर दर्शन झाल्यानंतर प्रसादालयात राष्ट्रपतींनी प्रसादाचे सेवनही केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता प्रत्येक तालुक्याला भाजपचे तीन अध्यक्ष; निवडीकडे लागले सर्वांचे लक्ष

अहिल्यानगर | नगर सह्याद्री भारतीय जनता पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्ष वाढीसाठी आता प्रत्येक...

‘कर्जुले हर्या येथे हरेश्वर महाराजांच्या उत्सवाची काल्याच्या कीर्तनाने सांगता’

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथे स्वयंभू भगवान श्री हरेश्वर महाराज यांचा...

‘भिक्षेकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणाची मंत्री विखे पाटलांनी घेतली गंभीर दखल’; दिले मोठे आदेश

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्हा रुग्णालयात चार भिक्षेकरूंचा मृत्यूनंतर प्रशासनावर गंभीर आरोप झाले आहेत. पालकमंत्री...

‘नगरमध्ये भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी’

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिंसा परमो धर्म: अशा महान उपदेश देत संपूर्ण जगाला दिशा देणाऱ्या...