spot_img
अहमदनगरनिकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम, बालकामगाराचा समावेश, ठेकेदाराची ग्रामस्थांना अरेरावी; पारनेर तालुक्यात नेमकं...

निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम, बालकामगाराचा समावेश, ठेकेदाराची ग्रामस्थांना अरेरावी; पारनेर तालुक्यात नेमकं चाललंय काय?

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील नांदूर पठार ते अणे शिवरस्ता (जिल्हा हद्द) या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्यासाठी 1.25 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून, हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

रस्त्याच्या कामावर बाल कामगार आढळून आल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत रस्त्याचे काम बंद पाडले. ठेकेदाराने यावेळी ग्रामस्थांशी अरेरावीची भाषा वापरल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. रस्त्याच्या कामात डांबराचा अत्यंत कमी वापर केला जात आहे, ज्यामुळे रस्त्याची गुणवत्ता ढासळत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्ता लवकर खराब होईल असा आरोप स्थानिक नागरिक करीत आहे.

याप्रसंगी माजी सरपंच जयराम चौधरी, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिरतार, गणेश आग्रे, सुभाष आग्रे, संतोष राजदेव, योगेश राजदेव, काशिनाथ आग्रे, स्वप्निल राजदेव आणि रवींद्र आग्रे, अविनाश घोलप, मयूर गाडेकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. रस्त्याच्या कामाची तपासणी करून गुणवत्ता सुधारली जावी आणि कामात पारदर्शकता ठेवली जावी. ठेकेदाराच्या अरेरावीच्या वर्तनाबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला असून, जोपर्यंत दर्जेदार काम होत नाही, तोपर्यंत कामाला परवानगी देणार नसल्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रस्त्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मातीमिश्रित खडीचा वापर
नांदूर पठार व आणे शिवरस्त्याचे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. या भागातून मोठ्या प्रमाणात वाहतूक असते त्यामुळे रस्ता चांगल्या दर्जाचा व्हावा अशी आमची मागणी आहे. परंतु रस्त्याच्या डांबरीकरणांमध्ये डांबराचा अत्यंत कमी वापर केला जात आहे. रस्त्यावर माती मिश्रित खडी पसरवली आहे.
– जयराम चौधरी माजी उपसरपंच, नांदूर पठार

सुधारणा न झाल्यास आंदोलन करणार : शिरतार
नांदूर पठार ते आणे दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा व मुख्य रस्ता आहे. या रस्त्याचे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणेआहे. काम योग्य पद्धतीने व्हावे अशीच ग्रामस्थांची मागणी आहे. कामामध्ये सुधारणा न झाल्यास बारा बलुतेदार संघटनेचे पारनेर तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिरतार यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

करिश्मा कपूरवर दुःखाचा डोंगर; पतीचे हार्ट अटॅकमुळे निधन

मुंबई । नगर सहयाद्री बॉलिवूडमधून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री करिश्मा...

चांदणी चौकात भीषण अपघात! अंगावर काटा आणणारं दृश्य; ब्रेक दाबताच कंटेनर…

Accident News:चांदणी चौकात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून, एका कंटेनर ट्रकला मोठा...

अहिल्यानगर वादळी वाऱ्याने हादरलं! शेतावरून परताना काळाने घात केला; एका वृद्ध महिलेचा मृत्यू

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात बुधवार (दि. ११ जून) सायंकाळी आलेल्या...

आजचे राशी भविष्य जरा गडबड करणार? ‘या’ राशीच्या लोकांनी सांभाळून रहा…

मुंबई। नगर सहयाद्री मेष राशी भविष्य अनपेक्षितपणे प्रवास करावा लागल्यामुळे दमून जाल. तेलाने मसाज करून शरीराच्या...