spot_img
अहमदनगरराजकारण भोवले ! शिक्षक बाळासाहेब खिलारी निलंबित, नीलेश लंके प्रतिष्ठानचे होते तालुकाध्यक्ष

राजकारण भोवले ! शिक्षक बाळासाहेब खिलारी निलंबित, नीलेश लंके प्रतिष्ठानचे होते तालुकाध्यक्ष

spot_img

अहमदनगर / नगर सहयाद्री : प्रदीप उर्फ बाळासाहेब खिलारी यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबित केले आहे. प्रदिपकुमार बबनराव खिलारी हे जिल्हा परिषदेच्या तास (वनकुटे) शाळेत शिक्षक होते. वारंवार शालेय कामी अनाधिकृतरीत्या गैरहजर राहुन शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केल्याने ही शिस्तभंगाची कारवाई केली.

खिलारी यांच्याबद्दल अनेक गंभीर तक्रारी होत्या. ते आमदार नीलेश लंके यांच्याशी संबंधित प्रतिष्ठानचा तालुकाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. जिल्हा परिषदेत सेवेत असताना अशी पदे घेता येत नाही. मात्र तरी देखील ते या पदावर काम करत होते व आमदार लंके यांच्या सक्रिय राजकारणात सहभागी होत होते अशी माहिती समजली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात पुढे म्हटले आहे की, जोपर्यंत निलंबनाचा आदेश अंमलात राहील तेवढ्या कालावधीत प्रदिपकुमार खिलारी यांचे मुख्यालय पंचायत समिती, कोपरगाव येथे राहील. त्यांना गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती, कोपरगाव यांच्या पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच त्यांनी खाजगी नोकरी स्विकारु नये, त्यांनी तसे केल्यास ते दोषारोप त्यांच्यावर ठेवण्यात तसेच ते निलंबन निर्वाह भत्ता गमविण्यास पात्र ठरतील असेही आदेशात म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अजितदादांना मोठा धक्का! ‘हा’ आमदार भाजपच्या वाटेवर? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेस...

आरक्षणामुळे कही खुशी कही गम; जिल्हा परिषद पंचायत समिती गट-गणातील आरक्षण जाहीर

जिल्हा परिषद पंचायत समिती गट-गणातील आरक्षण जाहीर | स्थानिक राजकारणात होणार उलथापालथ अहिल्यानगर ।...

पारनेर पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली...

खासदार संजय राऊतांची प्रकृती बिघडली; तातडीने फोर्टिस रुग्णालयात दाखल

MP Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे....