spot_img
महाराष्ट्रब्रेकिंग : मंत्री दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत, उपचार सुरु..

ब्रेकिंग : मंत्री दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत, उपचार सुरु..

spot_img

पुणे / नगर सह्याद्री : राष्ट्रवादी अजित पवार गटातील बडे नेते सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या हात, पाय आणि पाठीला दुखापत झाल्याची माहिती समजली असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. त्यांना १० ते १५ दिवस उपचार घ्यावे लागणार आहेत.

वळसे पाटील रात्री अंधारात लाईट सुरु करायला जात असताना पाय घसरुन पडले. त्यांना या घटनेत गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. दिलीप वळसे पाटील पाय घसरुन पडल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. पण या घटनेमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. वळसे पाटील यांना तसा कोणताही धोका नाहीय. ते लवकरच बरे होतील, अशी माहिती समोर येत आहे.

दिलीप वळसे पाटील यांच्यावर पुण्यातील औध येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वळसे पाटील यांची सध्या प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांच्यावर 12 ते 15 दिवस रुग्णालयात उपचार सुरु रहातील, असा अंदाज वर्तवण्यात येतोय. उपचाराला इतके दिवल लागतील हे पाहता त्यांना दुखापत गंभीर झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. पण ते लवकर बरे होतील, अशी माहिती समोर येत आहे.

दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. “काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईल”, अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवभाऊचं ठरलं; महाराष्ट्रात जल्लोष; सत्ता स्‍थापनेसाठी टोकाचे पाऊल…

मुंबई / नगर सह्याद्री - शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

आमदार संग्राम जगताप यांचे मंत्रिपद फायनल; कोण काय म्हणाले पहा

शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे...

मोठी बातमी; ब्रेक फेल झाल्याने बस थेट बसस्थानकातच घुसली

प्रवासी झाले जखमी; मोठा अनर्थ टळला पारनेर / नगर सह्याद्री पारनेर येथून मुंबईकडे जाणारी एसटी...

एकच भाऊ देवा भाऊ; गटनेतेपदी फडणवीसांची घोषणा होताच नगरमध्ये जल्लोष

देवेंद्र फडणवीस हे डायनामिक, सक्षम, प्रगतीशील नेतृत्व : अॅड. अभय आगरकर अहिल्यानगर / नगर सह्याद्री...