spot_img
राजकारणश्रीराम मंदिरावरून राजकारण ! रामललाची मूळ जन्मभूमी वेगळीच? मंदिर दुसऱ्याच ठिकाणी होतेय?...

श्रीराम मंदिरावरून राजकारण ! रामललाची मूळ जन्मभूमी वेगळीच? मंदिर दुसऱ्याच ठिकाणी होतेय? गंभीर आरोपींना योगींचे उत्तर

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : २२ तारखेला श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे सध्या त्याची जोरदार तयारी सुरु असून देशभरातील दिग्गज, मान्यवर या सोहळ्याला असतील. दरम्यान या उत्सवावरून राजकारणच चांगलेच तापले असताना भाजपावाल्यांनी राम मंदिराची जागा बदलली.

रामललाची मूळ जन्मभूमी ही बाबरी मशीद परिसर आहे. मात्र, आताचे राम मंदिर हे मूळ जागी बांधले जात नाही, असा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह अन्य विरोधकांकडून केला जात आहे. विरोधकांच्या या आरोपाला योगी आदित्यनाथ यांनी उत्तर दिले आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा उल्लेख करत योगी आदित्यनाथ यांनी थेट विचारणा केली आहे.

विरोधकांकडून केले जात असलेले दावे आणि आरोप चुकीचे आहेत. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे स्वतः अयोध्येला दर्शनासाठी आले होते. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत अयोध्येला आले होते, तेव्हा त्यांनी आपला अमूल्य सल्ला का दिला नाही, असा प्रतिप्रश्न योगी आदित्यनाथ यांनी केला.

दरम्यान, अयोध्येनंतर आता काशी आणि मथुरा या ठिकाणी भाजपा आपले वचन पूर्ण करणार का, असा प्रश्न योगी आदित्यनाथ यांना करण्यात आला होता. यावर बोलताना योगी आदित्यनाथ यांनी सविस्तर उत्तर दिले. हा विषय न्यायप्रविष्ट आहे. राम मंदिरासाठी ५०० वर्ष संघर्ष केला आहे. संयमित पद्धतीने आम्ही न्यायालयीन लढाई लढून विजय मिळवला आणि त्यानंतरच आता रामलला प्राणप्रतिष्ठा केली जात आहे. न्यायालयाच्या माध्यमातून अन्य ठिकाणचे मुद्देही सोडवले जातील. प्रभू श्रीकृष्णांची इच्छा असेल, तेव्हा तारखाही येतील आणि न्यायही मिळेल, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

गणेशोत्सव: कार्यकर्ता घडविणारा अखंड कारखाना राहिलाय का!

समाजकारण-राजकारणाचे बाळकडू मिळणारा मंडप जुगारी अड्डा अन् गुंड- मवाल्यांच्या ताब्यात गेल्याचं बाप्पाला दु:ख! ‘जय...

अहमदनगर जिल्हा बँकेत मोठी नोकर भरती; ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु…

अहमदनगर / नगर सह्याद्री - जिल्हा सहकारी बँकेत संचालक मंडळाच्या मान्यतेने सुमारे 700 पदांसाठी...

‘मराठा समाजाला झुलवत ठेऊन राजकारणाची पोळी भाजू नका’

आमदार राजेंद्र राऊतांचा मनोज जरांगेंना टोला सोलापूर | नगर सह्याद्री स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी कोणीही मराठा...

विधानसभा निवडणूक; नव्या सर्व्हेच्या अंदाजाने मविआची चिंता वाढली; काय आहे अंदाज पहा

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. यंदा कुणाची...