spot_img
ब्रेकिंगPolitics News: सरसकट पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का? शरद पवार काय म्हणाले...

Politics News: सरसकट पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का? शरद पवार काय म्हणाले पहा…

spot_img

सातारा | नगर सह्याद्री
भारतीय जनता पक्षासोबत जाण्यासाठी शरद पवार आग्रही होते, भाजपसोबत ६ वेळा बैठकाही झाल्या होत्या, असा खळबळजनक आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. अजित पवार यांच्या या दाव्यानंतर आता स्वतः शरद पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. तसेच २०२४ लोकसभेनंतर सरसकट पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत, असा मोठा दावा त्यांनी केला आहे.

काँग्रेस विचारधारेच्या जवळ जाणारे काही पक्ष आहेत. उदाहरणार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा एक आहे. दोन्ही पक्ष स्थापन झाल्यापासून एकत्र काम करत आहेत. एकत्र काम आणि एक विचारधारा यामुळे अधिक एकत्र काम करावं अशी माझी भावना आहे. मात्र सरसकट प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत, असे शरद पवार म्हणाले आहेत.

तसेच यावेळी बोलताना अजित पवार यांच्या दाव्यावरही शरद पवारांनी प्रत्यूत्तर दिले. काहीही झालं तरी आम्ही गांधी नेहरुंचा विचार सोडणार नाही. आमच्यातील काही सहकारी भाजपसोबत जाण्याच्या विचाराचे होते. मी सहकार्‍यांना सांगितलेलं चर्चा करायची तर तुम्ही करा. मात्र सोबत जाण्याचा निर्णय पक्षाचा नव्हता, असे ते म्हणाले. तसेच शिवसेना ही स्वतंत्र संघटना आहे. त्यांचे अस्तित्व स्वतंत्र आहे, असेही महत्वाचे विधान त्यांनी केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य; ‘या’ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळणार..

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य क्षणिक आवेगाने कोणताही निर्णय घेण्याची घाई करु नका,...

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....