spot_img
अहमदनगरकांद्याचे भाव कोसळले, नगरमध्ये लिलाव बंद

कांद्याचे भाव कोसळले, नगरमध्ये लिलाव बंद

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटविली. त्यामुळे कांद्याचे भाव वाढले होते. परंतु, दोन दिवसांपासून कांद्याचे भाव पुन्हा कोसळले आहेत. गुरुवारी कांद्याला १६०० रुपयांपर्यंत भाव मिळाल्याने संतप्त शेतकर्‍यांनी लिलाव बंद पाडले.

गत आवठवड्यात केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी हटविली होती. त्यामुळे निर्याद बंदी हटविल्यानंतर शेतकर्‍यांच्या कांद्याला भाव मिळू लागला. नगरच्या नेप्ती उपबाजार समितीमध्ये कांद्याला २४०० रुपयापर्यंत भाव मिळाला. परंतु, दोन-चार दिवसांतच कांद्याचे भाव पुन्हा कमी झाले.

पारनेरपाठोपाठ नगर बाजार समितीमध्येही कांद्याचे भाव कोसळले. गुरुवारी लिलाव सुरु झाले तेव्हा कांद्याला १६०० रुपयापर्यंत भाव मिळाला. त्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी लिलाब बंद पाडून सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले, माजी सभापती रामदास भोस यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी आंदोलन केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! योजनेच्या पडताळणीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (५ डिसेंबर) शपथविधीनंतर...

शनिवारी शटडाऊन, नगर शहरात पाणीपुरवठा बंद

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महावितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी शहर पाणी योजनेवर शनिवारी शटडाउन घेण्यात...

कोणी लाईट देता का लाईट?; महावितरणचे रोहित्र असून अडचण नसून खोळंबा

पिंपरी जलसेन | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील पिंपरी जलसेन येथील शेतकर्‍यांना शेतीपंप व घरगुती वीज...

राणी लंकेंना ओव्हर कॉन्फिडन्स नडला; कोण काय म्हणाले पहा…

लंके यांच्या टीकेवर अर्चना दाते यांचे उत्तर | ४० वर्षांची कारकीर्द पहा मग समजेल पारनेर...