Politics News:राजकारणात कुठल्याही क्षणी काही पण होऊ शकतं. महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या तीन वर्षांपासून धक्कातंत्र अवलंबवल जात आहे. अता लोकसभेपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू भाजपाची साथ सोडणार असून राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) पक्षात प्रवेश करणार असल्यामुळे भाजपला धक्का बसणार आहे.
सोलापूरमधील मोहोळचे भाजप नेते संजय क्षीरसागर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. भाजपत गेल्या दहा वर्षांत मला कायम अपमानास्पद वागणूक दिली गेल्यामुळे पक्षावर नाराज असलेले क्षीरसागर पक्षाला रामराम ठोकनार आहे.
भाजप नेते संजय क्षीरसागर लोकसभा निवडणुकीपूर्वीच २४ एप्रिल रोजी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे भाजपाला एक मोठा धक्का बसणार आहे.