Politics News:विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपावरून अद्याप एकमत झालेले नसले तरी काँग्रेसने देशातील २९० जागा लढविण्याची तयारी केली असून, त्यानुसार तेथील डेटा उपलब्ध करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
इंडीया आघाडीत वेगवेगळ्या राज्यांतील पक्षांमध्ये कोण किती जागा लढवाव्यात यावरून रस्सीखेच आहे. यामुळेच डेडलाइनच्या चार दिवसानंतरही जागा वाटपाचा फॉर्मूला निश्चीत होऊ शकला नाही. काही राज्यात तर काँग्रेससोबत जागांबद्दल तडजोड करण्यात सहकारी पक्षांनी नकार दिला आहे. तसेच काँग्रेसने जास्तीत जास्त जागा सोडाव्यात, यासाठी देखील दबाव आहे. चार जानेवारीला काँग्रेस हायकमांडने एक बैठक बोलवली असून सर्व राज्याचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाकडून जागा वाटपाबाबतीत नॅशनल अलायंस कमेटी स्थापन करण्यात आली आहे. या कमेटीची २९ आणि ३० डिसेंबरला मॅरथॉन बैठक घेण्यात आली आणि वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी वाटून देण्यात आली. या कमेटीने १० हून अधिक राज्यातील नेत्यांची भेट घेतली होती. त्यानुसार काँग्रेस २९० जागांवर ’एकला चलो रे’चा मार्ग स्वीकारत निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे.
काँग्रेस हायकमांडचा विचार आहे की, २०१९ च्या निवडणुकीत पक्षाला जेथे विजय मिळाला, तेथे आणि जेथे पक्ष दुसर्या क्रमांकावर होता, तेथे उमेदवार द्यावेत. काँग्रेसने अशा २९० जागांची यादी तयार केली आहे. काँग्रेसने डेटा गोळा केल्यानंतर ज्या जागांवर निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे, ती जागा कुठल्याही परिस्थितीत न सोडणयाच काँग्रेसचा विचार आहे. काँग्रेसने मागील दोन निवडणूकांचा डेटा लक्षात घेऊन फॉर्म्यूला तयार केला आहे.
पक्षाच्या हायकमांडने बिहार, यूपी, उत्तराखंड, गुजरात, जम्मू-काश्मीर, केरळ, तामिळनाडू, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या नेत्यांची बैठक घेतली आहे. या बैठकांसंबधी रिपोर्ट हायकमांडला देण्यात आले. अलायंस कमेटी प्रत्येक राज्यात एक नोट तयार करण्यास सांगितले आहे. तसेच पत्येक राज्यात वाटाघाटीवेळी कमेटीतील सदस्यांना पुढे केले जाण्याची शयता आहे.
अशी आहे योजना…
जम्मू-काश्मीरमध्ये २, लडाख १, पंजाब ६ प्लस, चंदीगड १, हिमाचल प्रदेश ४, हरियाणा १०, दिल्ली ३, राजस्थान २५, मध्य प्रदेश २९, छत्तीसगड ११, उत्तर प्रदेश १५-२०, उत्तराखंड ५, बिहार ६ ते ८, गुजरात २६, ओडिशा २१, पश्चिम बंगाल ६ ते १०, आंध्र प्रदेश २५, तेलंगणा १७, कर्नाटक २८, महाराष्ट्र १६ ते २०, तामिळनाडू ८, केरळ १६, गोवा २, झारखंड ७ आणि ईशान्येकडील राज्यांमधील २५ जागांवर निवडणूक लढवण्याची योजना काँग्रेसने आखली आहे.