spot_img
ब्रेकिंगPolitical News Today : भाजप देशाला गुलामगिरीकडे नेतोय, राहुल गांधींचं आजवरचं धडाकेबाज...

Political News Today : भाजप देशाला गुलामगिरीकडे नेतोय, राहुल गांधींचं आजवरचं धडाकेबाज भाषण

spot_img

नागपूर / नगर सह्याद्री :
Rahul Gandhi in Congress Vardhapan :
काँग्रेसचा आज 139 वा वर्धापनदिन आहे. या दिवसाचे औचित्य साधून नागपुरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते. यावेळी त्यांनी धडाकेबाज भाषण केले. rahul gandhi today

देशात सध्या दोन विचारसरणींचा संघर्ष सुरू आहे. विचार आणि सत्ता यांच्यात लढाई आहे. भारतीय जनता पक्ष देशाला स्वातंत्र्यपूर्व काळात, गुलामीच्या काळात नेण्याचा प्रयत्न करतोय, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांवर घणाघात केला.

ते म्हणाले की, भाजपची विचारधारा राजेशाही आहे. त्यांच्याकडे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करावे लागते. पण काँग्रेसमध्ये प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, आमच्या पक्षात लोकशाही आहे. आमचा विश्वास आहे की, सत्तेची लगाम देशातील नागरिकांच्या हातात असावी. गेल्या 40 वर्षांतील बेरोजगारी आज सर्वाधिक आहे. भारतातील करोडो तरुणांची शक्ती वाया जात आहे असा घणाघात त्यांनी केला.

तसेच ते बोलतां म्हणाले की, लोक म्हणतात काँग्रेस ने काय केलं? स्वातंत्र्यापूर्वी देशामध्ये 500 ते 600 राजे होते, इंग्रज होते. देशातील लोकांना कुठलाच अधिकार नव्हता, गरीब व्यक्तीची जमीन आवडली तर राजा घेत होता. ब्रिटिशांच्या काळात काँग्रेस गरीबांसाठी लढली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेला अधिकार दिले,

या देशामध्ये लोकशाही व्यवस्था प्रस्थापित केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक संविधानविरोधी आहेत. तिरंग्याला सलामी देत नव्हते, मात्र आपल्याला सर्व अधिकार संविधानाच्या माध्यमातून मिळाले. आरएसएसची विचारधारा देशाला पुन्हा गुलामीत घेऊन जाण्याची आहे. देशातील जनतेला शक्ती देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय असे राहुल गांधी म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

केडगाव हादरलं! महिलेवर सामूहिक अत्याचार; तीन ते चार जणांनी घेरलं अन्..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री केडगाव उपनगरातील एका परिसरात सामूहिक अत्याचार झाल्याचे वृत्त हाती आले आहे....

दोन झेडपी तर चार पंचायत समिती सदस्य वाढले; अनेक गावांचे गट बदलले, वाचा प्रारूप प्रभाग रचना..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार सोमवारी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद व पंचायत...

ऑलिम्पिकचे वेळापत्रक जाहीर ; क्रिकेटचाही समावेश, वाचा, कधी कुठली स्पर्धा?

Olympic schedule : बहुप्रतीक्षित ऑलिम्पिकचे वेळापत्रक जाहीर झाले असून ऑलिम्पिक 2028 स्पर्धेचा उद्घाटन समारंभ...

पावसाने पुन्हा एकदा दणका दिला! ‘कमबॅक’ मुळे या’ भागात पुरजन्य स्थिती, अहिल्यानगरलाही इशारा..

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यात पावसाने पुन्हा जोर पकडला असून अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची...