spot_img
राजकारणPolitical News : भाजपाच्या १२ खासदारांनी दिले राजीनामे

Political News : भाजपाच्या १२ खासदारांनी दिले राजीनामे

spot_img

नगर सह्याद्री / दिल्ली : भाजपाने आताच्या विधानसभा निवडणुकीत तीन राज्यांत मोठे यश मिळवले. या निवडणुकांमध्ये भाजपने वेगळीच रणनीती आखली होती. भाजपने या निडणुकीत २१ खासदारांना रिंगणात उतरवले होते.

त्यामुळे यात विजय मिळवणाऱ्या खासदारांना येत्या १४ दिवसांत विधानसभा की संसदेचे सदस्यत्व कायम ठेवायचे याचा निर्णय घ्यावा लागणार होता. त्यामुळे, भाजपच्या कोअर किमटीची महत्त्वाची बैठक दिल्लीत झाली. त्यामध्ये, भाजपच्या १२ खासदारांनी राजीनामा देण्याचे ठरवले असून आमदार बनलेल्या १० खासदारांनी राजीनामे दिले आहेत. उरलेले दोघे खासदारही राजीनामे देतील.

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नेतृत्त्वात या खासदारांचे शिष्टमंडळ पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींना भेटल्याची माहिती आहे. आमदार बनलेल्या खासदारांनी १४ दिवसांत यासंदर्भात निर्णय निर्णय न घेतल्यास त्यांचे संसद सदस्यत्व रद्द होऊ शकते. राज्यघटनेमध्ये तशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे, भाजपाकडून खासदारांच्या राजीनाम्यावर तातडीने निर्णय होत आहेत. भाजपने केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हादसिंह पटेल, फग्गनसिंह कुलस्ते यांच्यासह २१ खासदारांना विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरविले होते.

मध्य प्रदेशातील नरेंद्र सिंग तोमर, प्रल्हाद सिंग पटेल, राकेश सिंग, उदय प्रताप, रिती पाठक तर छत्तीसगडमधील अरुण सावो आणि गोमती साई. तसेच, राजस्थानमधून राज्यवर्धनसिंग राठोड, दिया कुमारी आणि किरोदी लाल मिना हे आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. यासह, बाबा बालकनाथ आणि रेणुका सिंह यांचाही राजीनामा दिला जाणार आहे. त्यामुळे, भाजपाचे संसदेतील १२ सदस्यांचे संख्याबळ कमी होणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...

मनसे-महाविकास आघाडीच्या मागणीला यश; निवडणूक आयोगाचे मतदार यादीतील घोळ तपासण्याचे आदेश

मुंबई । नगर सहयाद्री  राज्यातील मतदार यादीमधील घोळ आणि गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांनंतर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना...

साई संस्थानमधील ४७ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल;नेमकं प्रकरण काय?

शिर्डी । नगर सहयाद्री:- साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागातील तब्बल ७७ लाख रुपयांच्या विद्युत साहित्याच्या...