मुंबई / नगर सह्याद्री : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. त्यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर सोबत आहेत.
जवळपास तासभर या दोघांत चर्चा सुरू आहे. वर्षा या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरु आहे. राज ठाकरे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
ही भेट नेमकी कशासाठी झाली? याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. राज्यातील विकासकामांबाबत ही भेट होत असल्याची माहिती मिळत आहे. मागच्या वर्षभरात राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वारंवार भेटी झाल्या आहेत. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यातील मागच्या वर्षभरातील ही सहावी भेट आहे.