spot_img
अहमदनगरपोलिसांकडून पैशासाठी वाहनचालकाला मारहाण; अहमदनगरमधील खळबळजनक प्रकार

पोलिसांकडून पैशासाठी वाहनचालकाला मारहाण; अहमदनगरमधील खळबळजनक प्रकार

spot_img

कोपरगाव | नगर सह्याद्री

एका वाहनचालकास पोलीस कर्मचार्‍याने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली. पैशांसाठी ही मारहाण झाल्याचा आरोप करत या कर्मचार्‍यावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सध्या वारकरी व दिंडी पालख्या आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे चाललेल्या असल्यामुळे नगर-मनमाड महामार्गावरची अवजड वाहतूक कोपरगाव शहराजवळील पुणतांबा फाट्यावरून वळविण्यात आली आहे. जिल्हा पोलिसप्रमुख राकेश ओला यांच्या आदेशाने ही वाहतूक बदल करण्यात आला. परंतु याचाच फायदा संबंधित पोलिस घेत असून, येथे उपस्थित पोलिस हजार रुपये घेऊन शिर्डीतून वाहन नेण्यास परवानगी देत आहेत.

जे वाहनचालक पैसे देत नाहीत, त्यांना अक्षरशः मारहाणही करीत आहेत असा आरोप केला जात आहे. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाल्याने कोपरगाव येथील ट्रक चालक-मालक संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी या पोलिसांवर कारवाई करण्याचे निवेदन पोलिस निरीक्षकांना दिले आहे.
दिंड्यामुळे नगर-मनमाड रस्त्यावरची वाहतूक कोपरगाव शहरापासून जवळच असलेल्या पुणतांबा फाट्यावरून वाहतूक वळविण्यात आली आहे. येथे बॅरिकेड लावून पोलिस उभे असतात. या पोलिस कर्मचार्‍यांकडून राज्यातील इतर जिल्ह्यांतील व परप्रांतीय वाहनचालकांना प्रारंभी चांदेकसारे मार्गे जाण्याच्या सूचना केल्या जातात. हे अंतर लांब पडत असल्याने काही वाहनचालक शिर्डीतून जाण्याची विनंती करतात.

त्यांच्याकडून हजार रुपयांपर्यंतची मागणी केली जाते. एखादा चालक त्यास असमर्थता दर्शवितो, तेव्हा त्यास मारहाण देखील केली जाते असा आरोप होत आहे. गुरुवारी सकाळी एका परप्रांतीय वाहनचालकाने पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा त्यास शिव्या घालत उपस्थित पोलिस कर्मचार्‍याने मारहाण केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला.तेव्हा कोपरगाव येथील ट्रक चालक-मालक संघटनादेखील आक्रमक झाली. त्यांनी संबंधित पोलिस कर्मचार्‍यावर कारवाई व्हावी, अशी मागणी पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे शुक्रवारी केली. या निवेदनावर ट्रक चालक-मालक असोसिएशनचे अध्यक्ष अय्युब कच्छी, शैलेश रावळ, उल्हास जोशी, प्रकाश घोडके, भारत वैद्य, विकास वाळुंज, इरफान सय्यद, गौतम बोधक, योगेश वाळुंज, गणेश मोरे, विकी मोरे, आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

रामगिरी महाराजांचा वक्तव्यामुळे नवा वाद! नेमकं काय म्हणाले? वाचा..

Ramgiri Maharaj: देशाचं राष्ट्रगीत जन गण मन नाही तर वंदे मातरम पाहिजे'; असं वक्तव्य...

नगरमध्ये आढळला मृतदेह; हत्या कि आत्महत्या?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मधील आरडगाव शिवारातील मुळा नदी पात्रात अंदाजे...

राजकारणात पुन्हा भूकंप होणार?; शरद पवार गटाचे खासदार…

पुणे । नगर सहयाद्री:- राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार...

आता कशासाठी थांबायचे?; पक्ष सोडण्यावर नगरसेवक, पदाधिकारी ठाम

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- विधानसभा निवडणुकीवेळी वारंवार मागणी करूनही पक्षाच्या वरिष्ठांनी, नेतृत्वाने आमची दाखल घेतली...