spot_img
ब्रेकिंगलाडकी बहीण योजना बंद करण्याचा कट; पंतप्रधान नेमकं काय म्हणाले पहा...

लाडकी बहीण योजना बंद करण्याचा कट; पंतप्रधान नेमकं काय म्हणाले पहा…

spot_img

धुळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
धुळे / नगर सह्याद्री :
लाडकी बहीण योजनेची देशभरात चर्चा आहे. ही योजना बंद करण्यासाठी काँग्रेसने कोर्टात धाव घेतली होती, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. विरोधकांवर टीका करतानाच मोदींनी केलेल्या कामांचा पाढाही वाचला. त्याशिवाय मराठी भाषेवरही त्यांनी प्रकाश टाकला. मातृभाषा म्हणजे आपली आईच होय.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण केले. जगभरातून मराठी भाषिकांचे संदेश आले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
लाडकी बहीण योजना बंद करण्याचा कट करण्यात आला. लाडक्या बहि‍णींनी मविआपसून सावध राहायला हवं, असे मोदी म्हणाले.

धुळ्यातील सर्वांना रामराम. धुळ्यात भगवान खंडोबा यांचे आशीर्वाद घेण्याचे सौभाग्य मिळाले.2014 च्या निवडणुकीत मी धुळ्यात आलो होतो. महाराष्ट्रात सत्ता देण्याचं आवाहन केलं होतं आणि आपण अभूतपूर्व यश दिलं होतं.

धुळ्यातून 2024 विधानसभा निवडणुकीची सुरूवात करत आहे. मागील अडीच वर्षात महाराष्ट्राला जी गती मिळाली आहे तिला थांबू देणार नाही. विरोधकांच्या गाडीला ना चाक आहेत, ना बसायला सीट आहे. लोकांना लुटणारे महाविकास आघाडीत येतात तेव्हा विकास थांबवतात. महाआघाडीने लुटमार केली. समृध्दी महामार्ग होण्यात अडचणी नर्माण केल्या. आपल्या आशीर्वादाने हे सर्व बदलले…

एकनाथ शिंदेंच्या सरकारने विकास केला. भाजप महायुती आहे तर गती आहे, तर प्रगती आहे. महायुतीचा 10 संकल्पाची मोठी चर्चा होत आहे. महायुतीचा संकल्पनामामुळे महाराष्ट्राची प्रगती होणार. महायुतीचा वचननामा विकसित महाराष्ट्राचा भाग होणार आहे.

आमच्या बहीण-मुलींना सशक्त करण्यासाठी केंद्र सरकारने योजना आणल्या आहेत. विधानसभामध्ये महिलांना हक्क दिला. विरोधक आमची खिल्ली उडवत होते. आज महाराष्ट्रात कागदपत्रांवर आईचे नाव लावावे लागत आहे. आमची सरकार महिलांसाठी जे करत आहे ते काँग्रेसला सहन होत नाही. लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा सुरु आहे. लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काँग्रेस कोर्टात पोहचले होते, असा हल्लाबोल मोदींनी केला.

देशातील सर्वात मोठा पोर्ट महाराष्ट्रात होत आहे. आचारसंहिता संपेल महायुतीची शपतविधी पूर्ण होतच देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी काम करणार आहे. धुळ्याण्यासाठी मोठा निधी दिला जात आहे. शेतकऱ्यांना सोलर पंपासाठी सुट दिली जात आहे. धुळ्याच्या आजूबाजूला मोठया संख्येने आदिवासी राहतात. त्यांचा देशाच्या विकासात मोठा वाटा आहे.

महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक, ना ब्रेक
महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक आहेत ना ब्रेक आहे. चालकाच्या सीटसाठीही तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. आम्ही जनतेला ईश्वरांच रुप मानतो. जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहे. मात्र, महाविकास आघाडीतील नेते जनतेला लुटण्यासाठी राजकारणात आले आहेत, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी धुळ्यातून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीला लक्ष केलं. पंतप्रधान मोदी म्हणाले, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला. राज्यातील जनतेने त्यांचं अडीच वर्षांचे शासन बघितलं आहे. आधी त्यांनी सरकार लुटले, नंतर जनतेला लुटलं. त्यांनी मेट्रो प्रकल्प बंद केले, वाढवण बंदराचं काम थांबवण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. तसेच समृद्धी महामार्गाला विरोध केला, अशा नेत्यांपासून आता महाराष्ट्रातील जनतेने सावध होण्याची गरज आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अग्नीतांडव! फटाका कारखान्यात भीषण स्फोट, १७ जणांचा मृत्यू; कुठे घडला प्रकार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गुजरात राज्यातून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे....

घरात घुसून महिलेसोबत ‘तसले’ वर्तन; रावसाहेबवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात मद्य सेवन केलेल्या व्यक्तीने महिलेच्या घरात जबरदस्ती...

गावच्या विकासासाठी आमदार काशिनाथ दातेंनी दिला कानमंत्र; काय म्हणाले पहा…

नेप्तीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन अहिल्यानगर | नगर सह्याद्री गावा-गावातील धार्मिक एकात्मता भारतीय संस्कृतीने जोडली गेलेली आहे....

‘पारनेर ग्रामीण पतसंस्थेला ४.४३ कोटींचा नफा’

संस्थापक आ. काशिनाथ दातेंची माहिती पारनेर । नगर सहयाद्री:- सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ पारनेर...