अहमदनगर | नगर सह्याद्री
शहराच्या उपनगरातील बहुतांश रस्त्यांची कामे सुरू आहेत यासाठी राज्य शासनाकडून मोठा निधी प्राप्त झाला आहे. तसेच शहरातील मध्यवर्ती भागातील काही रस्ते खराब झाले असून नागरिकांना खड्डेमय रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून प्रलंबित रस्त्याची कामे मार्गी लावणार आहे. नियोजनबद्ध विकासाची कामे हाती घेतली असून टप्प्याटप्प्याने शहराच्या सर्वच भागामध्ये कामे मार्गी लागली जातील. तोफखाना भागातील प्रलंबित विकासकामांची पाहणी केली असून त्यासाठी लवकरच मोठा निधी उपलब्ध करून दिला जाईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
तोफखाना नेहरू मार्केट परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माजी उपमहापौर दीपक सुळ, सुरज जाधव, सारंग पंधाडे, प्रा. माणिकराव विधाते, अभिजीत खोसे, अभिजीत चिप्पा, आनंद पुंड, कैलास शिंदे, प्रशांत धलपे, अशोक शेकटकर, राजू सामल,रमेश चिप्पा, संजय कुंटला, रमेश अंकाराम, संतोष सामल, दत्तात्रेय अंकाराम, गिरीश पुरोहित, राजू तडका, बालकिसन कुरापट्टी, श्रीकांत भीमनाथ, आतिश अष्टेकर, व्यंकटेश अंकेत, किशोर सामल, मनीषा कुंटला, रेणुका सामल, जयश्री कुंटला, धलपे,सौ दगडे, सौ चन्ना आदी उपस्थित होते. माजी उपमहापौर दीपक सूळ म्हणाले की, तोफखाना भागातील प्रलंबित प्रश्नासाठी आ. संग्राम जगताप यांच्या माध्यमातून सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून प्रलंबित विकासाचे प्रश्न मार्गी लावले जातील.
प्रभाग १३ मधील चिप्पा घर ते धलपे घर ते शेकटकर घरापर्यंतच्या रस्ता काँक्रीटीकरण करण्याचे काम पूर्ण झाले आहे. तोफखाना परिसरातील भाग विविध प्रभागांमध्ये विभागला गेला असल्यामुळे नगरसेवकांनी तोफखाना परिसराच्या विकास कामाकडे दुर्लक्ष केले होते. मात्र आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून विकासाचे कामे मार्गी लागले जातील असे ते म्हणाले.