spot_img
अहमदनगर४० टक्के कामाचे ९० टक्के बिल अदा! पाण्याची टाकी चोरी गेल्याची तक्रार,...

४० टक्के कामाचे ९० टक्के बिल अदा! पाण्याची टाकी चोरी गेल्याची तक्रार, ‘या’ गावातील नेमकं प्रकरण काय?

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील वडगाव सावताळ येथील सुमारे एक कोटी ९१ लाख रूपयांच्या जलजीवन योजनेचे फक्त ४० टक्के काम झाले आहे. मात्र या योजणेचे एक कोटी ८० लाख रूपये म्हणजे सुमारे ९० टक्के पैसे ठेकेदारास वर्ग करण्यात आले आहेत. अद्यापही या पाणी योजनेच्या अनेक वस्त्यांवरील जलवाहिनी तसेच पाण्याची टाकी व इतर अशी कामे करणे बाकी आहे. या बाबत महादू बन्शी रोकडे व ग्रामस्थ यांनी औरंगाबाद खंडपिठात जनहित याचिका सादर केली होती. आता १० एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने मुख्यकार्यकारी अधिकारी व ठेकेदार व इतर ११ जणांना आपले म्हणणे मांडण्याचा आदेश दिला आहे.

जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत वडगाव सावताळ गावासाठी एक कोटी ९१ लाख रूपयांच्या योजणेचे काम सुरू आहे. या योजणेतील वितरण व्यवस्थेमधील जलवाहिणीचे वाडी वस्त्यांवरील कामे पुर्ण झालेली नाहीत. अनेक ठिकाणी खोदाई केली मात्र पाईप टाकले नाहीत. तसेच १० ते १२ वाड्या वस्त्यांसाठी चार जलकुंभ आहेत मात्र फक्त दोनच जुलकुंभाची कामे पुर्ण झाले आहेत. तसेच दोन हजार ६५० मीटर लोखंडी पाईप न टाकता ठेकेदाराने त्याचे बील मात्र काढले आहे. या पुर्वीचीही गावात सुमारे तीन कोटी रूपयांची भारत निर्माणची ग्रामिण पाणी फक्त कागदोपत्री पुर्ण झाली आहे.

त्या योजणेचे पाणी गावाला पिण्यास मिळाले नाही. आताही ही नव्याने होत असलेल्या पाणी योजणेचे पाणी गावाला पिण्यास मिळणार नसल्याने रोकडे यांनी ग्रामस्थांकडून लोकवर्गणी करत अ‍ॅड. संदीप आंधळे यांचे मार्फत ४ मार्चला उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या जनहित याचिकेच्या दोन सुनावण्या झाल्या असून आता १० एप्रील रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी ठेकेदार व इतर ११ जनांना आपले म्हणणे मांडण्याच्या नोटीसा न्यायालयाने बजाविल्या आहेत.

वडगाव सावताळ गावाच्या पाणी योजनेसाठी सुमारे पाच कोटी रूपयांचा खर्च करूणही ग्रामस्थांना पिण्यास पाणी मिळणार नाही या भावनेतून आम्ही जनहित याचिका दाखल केली आहे. या पुर्वी आम्ही संबधीत योजणेचे अधिकारी तसेच जिल्हा परीषदेकडे तक्रार करूनही जिल्हा परिषदेने दखल घेतली नाही म्हणून आम्ही उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.
– महादू रोकडे ( याचिकाकर्ता)

पाणी टाकी गेली चोरीला
उच्च न्यायालयाने जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, ग्रामसेवक, पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष व ठेकेदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याचिकेत नमूद केले की, अधिका-यांना हाताशी धरूण ९० टक्के कामाचे पैसे अदा केले आहेत. प्रत्यक्षात ५० टक्केही काम पूर्ण झालेले नाही. या पुर्वी याचिकाकर्ते रोकडे यांनी ग्रामस्थांसह मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पिण्याच्या पाण्याची टाकी चोरीला गेल्याचीही तक्रार केली होती.

राजकीय हेतूने ग्रामपंचायत बदनामीचे षडयंत्र
जल जीवन मिशन योजनेअंतर्गत वडगाव सावताळ येथील साळुंखे झाप येथे ३० हजार लिटर पाण्याची टाकी बांधण्यात येणार होती. परंतु या टाकीचा फायदा फक्त आठ ते दहा घरांना होणार होता. त्यामुळे सर्व शासकीय परवानगी घेऊन तरटी फाटा येथे ही टाकी बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा फायदा जवळपास ४० ते ५० घरांना होणार आहे. तर दुसरीकडे ज्याप्रमाणे काम झालेले आहे त्याप्रमाणे मूल्यांकन करून या पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला बिल अदा करण्यात आलेली आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून ग्रामपंचायतची पदाधिकार्‍यांची बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे.
– सरपंच , संजय रोकडे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...