spot_img
अहमदनगरपारनेरमध्ये पवारांचे सूचक वक्तव्य, अनेकांच्या भुवया उंचावल्या

पारनेरमध्ये पवारांचे सूचक वक्तव्य, अनेकांच्या भुवया उंचावल्या

spot_img

शेतीमालाला भाव अन रोजगारासाठी महाराष्ट्रात संघर्ष यात्रा ः आ. पवार / पारनेरमध्ये वीरपत्नी, एकल महिलांची भाऊबीज
पारनेर | नगर सह्याद्री – 
शेतीमालाला रास्त भाव हक्काचे पाणी व बेरोजगार तरूणांच्या हाताला काम देण्यासाठी चोंडी ते नागपूर ही ८५० किलोमीटरची संघर्ष यात्रा महाराष्ट्रात काढणार असुन हिवाळी अधिवेशनात या संदर्भात भुमिका मांडणार असल्याचे  आमदार रोहित पवार यांनी सांगितले. पारनेर तालुयाच्या दौर्‍यावर आलो असताना माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी माझ्या गाडीचे सारथ्य केले असून भविष्यात मी तुमच्या गाडीचे सारथ्य करणार असल्याचे सुचक व्यक्तव्य आमदार पवार यांनी या कार्यक्रमात केले आहे.

पारनेर शहरात माजी नगराध्यक्ष विजय औटी यांच्या संकल्पनेतून भाऊबीजचे औचित्य साधून वीरपत्नी व एकल महिलांचे भाऊबीजचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बारामती अ‍ॅग्रोचे सर्वेसर्वा राजेंद्र पवार व आमदार पवार, सुनंदाताई पवार, कुंती पवार, सईताई पवार, रविकांत वर्पे, माजी नगरसेवक नंदकुमार औटी, योगिता औटी, सिंधुताई औटी, सीमा औटी, मयुरी औटी, माजी महापौर अभिषेक कळमकर, बाळराजे पाटील, अशोक बाबर, योगेश झंजाड, संगिता वराळ, संतोष कावरे, प्रीतेश पानमंद, अ‍ॅड. कृष्णाजी जगदाळे, अशोक बाबर, रूपेश ढवण, किसनराव बेलमुखा, सिध्दांत आंधळे, शेखर काशिद, मोनिका सोनवणे यांच्या सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आमदार पवार म्हणाले, सुपा औद्योगिक वसाहतीसाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे स्थानिक भुमीपुत्रांना नोकरी दिली जात नाही ही बाब खरी आहे. त्यामुळे संघर्ष यात्रेच्या माध्यमातून हा मुद्दा पुढे नेणार आहे. शिक्षण घेवून नोकरी व हाताला काम मिळत नसेल तर ही २२ दिवसांत ८५० किलो मीटर संघर्ष यात्रा चालणार आहे. शेती पाणी बेरोजगारी मुद्याचे बोला सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी जामखेड तालुयातील चोंडी येथुन हि यात्रा नागपूर पर्यंत हि संघर्ष यात्रा चालणार आहे.  काही महिन्यांपूर्वी विजय औटी व माझी भेट झाली एकदम रांगडा व मनाचा सच्चा गडी आहे. माझ्या गाडीचे सारथ्य तुम्ही केले परंतु यापुढील काळात तुमच्या गाडीचे सारथ्य करणार आहे.

पवार कुटुंबीय पहिल्यांदा आपल्या तालुयांत भाऊबीज साजरी केली आहे. यवतमाळ बुलढाण्यात दिवाळी लोकांत जावुंन साजरी केली. घर कुणी जाळले असेल तर ते उभे करण्याची जबाबदारी आमची आहे.  संजय गांधी निराधार अनुदान सह इतर अनुदान वाढीसाठी प्रयत्न करणार आहे.  तरुणांच्या हाताला काम व पोटाला अन्न देणे गरजेचे आहे. कर्जत जामखेड जबाबदारी पाण्यासाठी घेतली आहे. त्याप्रमाणे पारनेरची जबाबदारी घेणार आहे. अनेक लोक नाटक करू शकतात परंतु मोठ्या मनाने या महिला मोठ्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या आहेत. माजी नगराध्यक्ष विजय औटी म्हणाले, नगर पंचायत अध्यक्ष असताना कडी पत्तासारखे मला बाजुला काढले. शरद पवार व तुमचा हात फक्त डोयावर ठेवा तुमच्या सारखे सहकारी मला मिळाल्याने तालुयातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सुपा व नगर औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिक तरूणांना रोजगार दिला जात नाही. त्यामुळे तुमच्या विचारांना बरोबर घेवून काम करणार आहे. विधानसभेत सर्व सामान्य लोकांचे प्रश्न तातडीने मांडण्माचे काम आमदार रोहित पवार करु शकतात. तालुयामध्यै शो बाजी चालत असुन हे थांबविण्यासाठी काम करणार असल्याचे माजी नगराध्यक्ष औटी म्हणाले.

एकल महिलांसाठी आधार देणारा उपक्रम
सुनंदाताई पवार म्हणाल्या की, महाराष्ट्रातील जिजाऊंच्या स्मृती तळावर जावुंन या संघर्ष यात्रेला सुरुवात होवुन यवतमाळ येथील आत्महत्या केलेल्या कुटुंबियां समवेत दिवाळी साजरी केली. गेल्या ३५ वर्षापासून बारामती व परिसरातील गोरगरीब व गरजू ८०० मुलींना आपल्या पायावर पोलिस दलात भरती करुन उभ्या केल्या आहेत. भीमथडी यात्रा असो् वा बचत गटाच्या माध्यमातून हजारो तळागाळातील महिला आपल्या पायावर उभ्या केल्या आहेत. एकल महिलांनी सहानभुतीचे शिकार न होता आपल्या पायावर उभे राहण्यासाठी काम केले पाहिजे. विधवा व गरजू महिलांना वेगवेगळ्या माध्यमातून काम केले पाहिजे. आयुष्य हे सोशल मीडियावर न घालता समाजासाठी व कुटुंबासाठी काम करायचे आहे. १० कोटी रुपयांचे कर्ज महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून ४ वर्षापासून केले आहे. त्यामुळे अनेक शासकीय योजना महिलांना माहिती नाही त्यामुळे प्रशासकीय योजना माहिती पाहिजे.

रोहित पवार कुटुंबियाची पारनेरमध्ये भाऊबीज साजरी
बारामती अ‍ॅग्रोचे सर्वेसर्वा राजेंद्र पवार व आमदार रोहित पवार, सुनंदाताई पवार, कुंती पवार, सईताई पवार, शिवांश आनंदिता या पवार कुटुंबीयांनी पारनेर तालुयातील आदिवासी विधवा व वीरमाता व वीर पत्नी समवेत भाऊबीज साजरी केली. संगिता वराळ, संगीता भोर, मंदाताई कातोरे, रजनी भालेराव उपस्थित होत्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...