spot_img
ब्रेकिंगपवार इज पॉवर! अजित पवार आज, काल..;आमदार लंके यांची 'त्या' भाष्यावर प्रतिक्रिया

पवार इज पॉवर! अजित पवार आज, काल..;आमदार लंके यांची ‘त्या’ भाष्यावर प्रतिक्रिया

spot_img

पारनेर। नगर सहयाद्री 
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमचे कालही नेते होते, आजही आहे आणि उद्या राहतील. आपल्या नेत्याच्या मुखातून जर एखादा शब्द गेला तर त्यावर कार्यकर्त्यांनी भाष्य करायचे नसते किंवा नाराज पण व्हायचे नसते. माझ्या भूमिकेवर दादा नाराज झाले किंवा खुश झाले हा आमच्या दोघांमधील प्रश्न आहे. इतरांनी त्यामध्ये वितुष्ट आणायचे नाही, अशी प्रतिक्रिया आमदार नीलेश लंके यांनी तुळजापूर येथे दिली. डॉ. आमदार नीलेश लंके यांनी कार्यकर्त्यांसह शनिवारी दि. १६ रोजी तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या राजकीय घडामोडीवर भाष्य केले.

आमदार लंके म्हणाले की, विकास कामे करणे हाच माझा राजमार्ग आहे. कोण काय बोलते व कोण टीका टिप्पणी करते याकडे मी लक्ष देत नाही. या राजमार्गामुळे मला कोणत्याही प्रकारची राजकीय वारसा अथवा पार्श्वभूमी नसतानाही मी आमदार झालो. मी एक खेळाडू असून हार मानणारा खेळाडू नाही. खेळाडू हा खेळ खेळत असतो. राजकारणात मी आव्हान समजत नाही. आनंदाने ती संकट परतवण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे.

सरकारच्या माध्यमातून अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामकरण झाले. वीरमाता अहिल्यादेवी यांचे समाज घडवण्यामध्ये मोठे योगदान आहे. त्यांच्या नावाने जर जिल्ह्याची ओळख होत असेल तर निश्चित अभिमानासद बाब असून शासनाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. तुळजा भवानी मातेला प्रार्थना केली की माझ्या गोरगरीब जनतेला व शेतकर्‍यांना सुखी ठेव. तुळजाभवानी माता हे माझे श्रद्धास्थान असून गेले अनेक वर्षापासून दर्शनसाठी येत असतो. मी देवी भक्त असून मी देवदर्शनासाठी कायमच जात असतो. परंतु जो देवी भक्त आहे त्याला स्वतःसाठी मागण्याची काही गरज नाही असेही आमदार लंके म्हणाले.

पवार इज पॉवर! सर्व पवार कुटुंबीयांवर प्रेम: आमदार लंके
महाराष्ट्राच्या राजकारणात मी कार्यकर्ता म्हणून काम करत असून सर्वसामान्य कार्यकर्त्याला कोणत्याही प्रकारचे गट तट नसतात. पवार इज पॉवर व सर्व पवार कुटुंबियांवर माझे प्रेम असून निवडणूक लढवताना कार्यकर्त्यांबरोबर चर्चा सल्लामसलत केली पाहिजे. त्याचबरोबर जनभावना काय आहे याकडेही लक्ष दिले पाहिजे. तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जात असताना पारनेर ते खर्डा जामखेड प्रत्येक गावागावांमध्ये वाजत गाजत उत्स्फूर्त स्वागत झाले. त्यामुळे राजकारण करत असताना कोणाच्या बोलण्याकडे लक्ष न देता मी कामाला महत्त्व देणारा माणूस असल्याचे आमदार लंके यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नागरिकांनो सतर्क राहा! हवामान खात्याचा हादरवणारा रिपोर्ट; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट?

Weather Update: राज्यातील तापमानात घट झाली असून उकाड्यातही दिलासा मिळाला आहे. आज मध्य महाराष्ट्र...

शरद पवारांच्या वक्तव्यावर मंत्री विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘दोघं एकत्र आले तर…’

Politics News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा राज्यात खूप रंगल्या असताना, गुरुवारी राज्याचे जलसंपदा...

आजचे राशी भविष्य! ‘मे’ महिन्यातील उत्तम दिन, ‘या’ राशीच्या जीवनात मोठे बदल घडणार

मुंबई। नगर सह्याद्री मेष राशी तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची...

गुड न्यूज! 13 मे पर्यंत मान्सून अंदमनात धडकणार

मुंबई | नगर सह्याद्री मान्सूनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. यावष मान्सून लवकरच दाखल होणार...