spot_img
अहमदनगरपक्ष फुटला...! तर सुनाही परक्‍या वाटू लागल्‍या का?, विखे पाटलांचा शरद पवार...

पक्ष फुटला…! तर सुनाही परक्‍या वाटू लागल्‍या का?, विखे पाटलांचा शरद पवार यांना टोला

spot_img

कोल्‍हार, / नगर सह्याद्री –
पक्ष फुटला तर तुम्‍हाला तुमच्‍या सुनाही परक्‍या वाटू लागल्‍या का? असा खोचक टोला महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी शरद पवार यांना लगावला.

शिर्डी लोकसभा मतदार संघात मंत्री विखे पाटील यांनी पाथरे बुद्रूक, कोल्‍हार, भगवतीपुर आणि तिसगाव येथे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बुथप्रमुखांशी संपर्क साधून, आगामी निवडणूकीच्‍या दृष्‍टीने सुचना केल्‍या. विविध ठिकाणी झालेल्‍या बैठकांमध्‍ये त्‍यांनी केंद्र व राज्‍य सरकारच्‍या योजनांची माहीती दिली.

आपल्‍या भाषणात मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, केवळ व्‍यक्तिव्‍देशापोटी पंतप्रधान मोदींना विरोध करण्‍यासाठी देशातील नेते एक‍त्र आले आहेत. परंतू यांच्‍याकडे देशाच्‍या विकासाचा कोणताही अजेंडा नाही. यांच्‍या आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवारही अद्याप ठरलेला नाही. या सर्व राजकीय पार्श्‍वभूमीवर देशातील जनतेने आता पुन्‍हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्‍याचा निर्धार केला असल्‍याचे सांगून जनतेचे पाठबळ मोदीजींच्‍या पाठीशी भक्‍कमपणे उभे राहील असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

शिर्डी लोकसभा मतदार संघात केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली आहे. लाभार्थी मोठ्या संख्‍येने असल्‍याने निवडणूकीच्‍या निमित्‍ताने सर्व लाभार्थ्‍यांना महायुतीच्‍या उमेदवारांना मतदान करण्‍यासाठी त्‍यांच्‍याशी संपर्क साधा असे कार्यकर्ते आणि पदाधिका-यांना मंत्री विखे पाटील यांनी सुचित केले.
मंत्री विखे पाटील यांनी आडगाव बुद्रूक, खुर्द, केलवड, को-हाळे या गावांनाही भेटी देवून ग्रामस्‍थांच्‍या भेटी घेतल्‍या. या ठिकाणी झालेल्‍या बैठकांमध्‍ये महायुती सरकारमुळेच निळवंडेचे पाणी शेतक-यांना मिळू शक्‍ले. अद्याप चा-यांची कामे बाकी असून, यासाठी महायुती सरकारच निधी उपलब्‍ध करुन देईल अशी ग्‍वाही देवून, आपल्‍या भागातील युवकांसाठी रोजगाराची निर्मिती करणे हेच आपले उदिष्‍ठ आहे. यासाठी जमीनीची उपलब्‍धता झाली असून, नव्‍याने विकसीत होणा-या औद्योगिक वसाहतीमध्‍ये मोठे उद्योग आता येण्‍यास उत्‍सुक असल्‍याची माहीतीही त्‍यांनी दिली.

मोदीजींच्‍या नेतृत्‍वाखाली समृध्‍द भारत घडत असून, मागील दहा वर्षात देशाचा झालेला विकास पाहाता जगामध्‍ये मोदीजींचे नेतृत्‍व हे विश्‍वमान्‍य झाले आहे. भ्रष्‍ट्राचार मुक्‍त कारभारामुळे योजनांचा लाभ थेट लाभार्थ्‍यांपर्यत मिळू शकला असल्‍याचे ना.विखे पाटील म्‍हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....