spot_img
अहमदनगरParner News:...अखेर सुपा शहराला 'ती' सुविधा मिळणार! मागणीला यश, ग्रामस्थांमधून समाधान

Parner News:…अखेर सुपा शहराला ‘ती’ सुविधा मिळणार! मागणीला यश, ग्रामस्थांमधून समाधान

spot_img

सुपा | नगर सह्याद्री-
पारनेर तालुक्यातील सुपा शहराचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असलेल्या कचरा डेपोसाठी दोन दिवसात जागा उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली होती.

गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विखे पाटील पारनेर दौर्यावर आले असता सुपा ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना कचरा डेपो साठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले होते.

विखे पाटील यांनी दिलेल्या शब्द खरा केला असून अखेर सुपा ग्रामपंचायतीला कचरा संकलनासाठी जागा उपलब्ध झाली आहे.सुपा शहर हे तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेले केंद्र बनले आहे.

मागिल चार ते पाच वर्षांपासून शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सुपा शहरात एमआयडीसी असल्यामुळे येथील लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गावची लोकसंख्या ३० ते ३५ हजारच्या आसपास झाली असून सुपा गावचा कचरा प्रश्न वाढत आहे.

मौजे सुपा ग्रामपंचायतीचा दैनंदिनी गोळा होणारा कचरा गट नंबर ४०६ जागेत गेली ७ – ८ वर्षांपासून उघड्यावर साठविला जात होता. मात्र असे असताना कचरा गोळा करून त्याचे विलगिकरण करणे महत्त्वाचे आहे. सुपा गावची वाढती लोकसंख्या लक्षात घेता कचरा डेपो साठी पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध होणे गरजेचे होते.

प्रकल्प उभा करण्यासाठी लोकवस्ती पासून दूरच्या अंतरावर असलेल्या सरकारी गट नंबर ४०६ मध्ये कचरा डेपो साठी किमान ०.८० हेक्टर क्षेत्राची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे यापुर्वी केली होती.

ही जागा ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यासाठी अनंत अडचणी होत्या त्या सर्व अडचणी दूर झाल्या असून कचरा साठविण्यासाठी जागा उपलब्ध झाल्याने गेली तीन वर्षे बंद असलेल्या घंटागाड्या शहरात धावू लागल्या आहेत.

मंगळवार दि.१२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता कचरा संकलनाचा शुभारंभ करण्यात आला. सुपा शहर स्वच्छ होऊ लागले असून ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. यामुळे ग्रामस्थांनी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य यांचे आभार मानले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्करांच्या घरी राडा? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...

भाजपचे उमेदवार ठरले, आज पहिली यादी? कुणाला मिळणार डच्चू! वाचा सविस्तर…

Politics News : राज्यात पुढच्या महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक...