spot_img
ब्रेकिंगपारनेर: शेतकऱ्यांवर अन्याय 'ती' आकडेवारी चुकीची; कोरडे यांनी केली 'ही' मागणी

पारनेर: शेतकऱ्यांवर अन्याय ‘ती’ आकडेवारी चुकीची; कोरडे यांनी केली ‘ही’ मागणी

spot_img

भाजप नेते विश्वनाथ कोरडे यांचे तहसीलदार यांना निवेदन

शरद झावरे। नगर सहयाद्री

तालुयातील दोन-चार गावे वगळता अनेक गावात पावसाचे प्रमाण कमी असतानाही चुकीची आकडेवारी लागल्याने दुष्काळी मदतीपासून पारनेर तालुयातील गावे वंचित राहणार आहेत. त्यामुळे पारनेर तालुयात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार गायत्री सौंदाणे यांच्याकडे केली आहे.

राज्य सरकारने घोषित केलेल्या दुष्काळी तालुयांच्या यादीत पारनेरमधील वास्तविक परिस्थितीचा विचार करून समावेश करावा, असे कोरडे यांनी निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी कोरडे यांच्यासह भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, पुणेवाडी गावचे माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे, अभिमन्यू थोरात, महेश वाघ, किसनरावं शिंदे, महेश वाळुंज, आप्पासाहेब फडके यांसह विविध गावांतील भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

राज्य सरकारने नुकतीच दुष्काळी तालुयांची यादी घोषित करून तेथील शेतकर्‍यांना सवलती देण्याचे जाहीर केल्याकडे निवेदनात लक्ष वेधले आहे. या यादीमध्ये २०२३ च्या खरीप हंगामात प्रत्यक्षात दुष्काळाच्या झळा सोसूनही पारनेर तालुयाचा समावेश झाला नसल्याचे म्हटले आहे. पारनेर तालुयाचे नाव दुष्काळी तालुयांच्या यादीतून वगळणे ही बाब वास्तविकतेचा विचार केल्यास तालुयातील शेतकर्‍यांवर अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मुल्यांकन करणार्‍या कार्यप्रणालीच्या त्रुटी भरून काढत पारनेरमधील शेतकर्‍यांना न्याय देणे गरजेचे आहे. सन २०२३ च्या खरीप हंगामात पारनेरच्या पठार भागासह पोखरी, पळसपूर, सावरगाव, गुरेवाडी, नळवणे, डोंगरवाडी, खडकवाडी, पळशी, वनकुटे, ढवळपुरीसह विविध भागांत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातही तालुयातील सुमारे अर्ध्याहून अधिक भागात लवकरच जनावरांच्या चार्‍याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार असल्याची शयता आहे.

हजारो हेटर क्षेत्रावरील शेतमाल पावसाअभावी करपून जाण्याच्या मार्गावर आहे. पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत शेवटच्या घटका मोजत असून तालुयातील कुकडी लाभक्षेत्रातील गावे वगळता इतरत्र भयाण परिस्थिती निर्माण होण्याच्या मार्गावर आहे. पारनेर तालुयाच्या भौगोलिक विविधतेचा व सध्याच्या वास्तविक परिस्थितीचा विचार करून तालुयातील सातत्याने अडचणीत येत असलेल्या शेतकर्‍यांना मदत करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...