spot_img
ब्रेकिंगपारनेर तापलं! पुढाऱ्यांना नो एंट्री तर 'हे' गाव बंद; देसवड्यात सरकारचे प्रेत...

पारनेर तापलं! पुढाऱ्यांना नो एंट्री तर ‘हे’ गाव बंद; देसवड्यात सरकारचे प्रेत स्मशानात…

spot_img

पारनेर। नगर सहयाद्री-
मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण देखील लागल्याचं चित्र अमोर येत आहेत. सरकारने मराठा समाजाला नुसते खोटेनाटे सांगून झुलवत ठेवल्याने मराठा बांधव आक्रमक झाले आहे. पारनेर तालुक्यातील देखील वातावरण तापल्याचे चित्र समोर येत आहे.

मराठा आरक्षणासाठी देसवडे ग्रामस्थांकडून सरकारचा अंत्यविधी

देसवडे गावात सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कुठलीही ठोस भूमिका न घेणाऱ्या राजकीय नेत्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. तिरडी बांधून त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे फोटो असलेला बॅनर बांधून चार खांदेकरी व पाचवा पाणोड्या अशी हूबेहूब प्रतिकात्मक अंत्ययात्राच काढली. या अंत्ययात्रेत उपस्थित असलेल्या तरूणांना अक्षरशः टाहो फोडला होता. या प्रतिकात्मक अंत्ययात्रेला देसवडे ग्रामपंचायतपासून सुरुवात झाली. गावातून निघालेली ही अंत्ययात्रा मुळा नदीकिनारी असलेल्या गावातील स्मशानभूमीपर्यंत काढण्यात आली होती. यावेळी देसवडे परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठा आरक्षणासाठी टाकळी ढोकेश्वर १०० टक्के बंद

मनोज जारंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाच्या आरक्षणासाठी टाकळीकर ग्रामस्थांच्या वतीने मंगळवारी बंदचे आव्हान पुकारण्यात आले होते. या कडकडीत बंदला १०० टक्के मंगळवारी प्रतिसाद मिळाला असून मंगळवारचा आठवडे बाजार बंद झाला होता. या बंदला टाकळी ढोकेश्वर गावातील व्यावसायिकांनी व इतरांनी उस्फुर्तपणे प्रतिसाद देत या बंदमध्ये सहभागी झाले होते. सकल मराठा समाजा वतीने पारनेरचे पोलीस निरीक्षक विजय ठाकूर यांना यासंबंधीचे लेखी निवेदन देण्यात आले होते.

युवकांची मोटर सायकल रॅली

मराठा समाज आरक्षण मिळाले पाहिजे व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पोखरी म्हसोबा झाप वारणवाडी टाकळी ढोकेश्वर वासुंदे येथील युवकांनी शेकडो मोटरसायकलची रॅली काढून या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचे.. मराठा समाजाला कुणबी आरक्षण मिळालेच पाहिजे या घोषणांनी अक्षरशा वासुंदे चौक दुमदुमून गेला होता.

मुस्लिम व जैंन समाजाच्या मराठा आंदोलनाला पाठिंबा

मराठा समाजाला आरक्षण मिळावे पाहिजे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पाच दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे.या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व आरक्षण मागणीसाठी सकल मराठी समाजाच्या वतीने मंगळवारी टाकळी ढोकेश्वर गाव बंदचे आवाहन केले होते.या आवाहनाला टाकळी ढोकेश्वर ग्रामस्थांनी व व्यवसायांनी प्रतिसाद दिला आहे.तर दुसरीकडे या मराठा आरक्षणाला जैंन समाजाचा वतीने जाहीर पाठिंबा अर्बन बँकेचे अध्यक्ष अशोक कटारिया यांनी व्यक्त केला आहे तर मुस्लिम समाजाच्या वतीने या मराठा आरक्षण व आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचे पत्रकार चाॅंदभाई शेख यांनी जाहिर केले आहे.

सुपा, वाळविणे, शहाजापुरकरांची पुढाऱ्यांना गाव बंदी

राजकारण गेले चुलीत, तुमचा पक्ष गेला चुलीत जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षाच्या नेत्याने आथवा त्याच्या चमच्याने आमच्या गावात प्रवेश करु नये अशी तंबी सुपा, वाळवणे शहाजापुरच्या ग्रामस्थांनी पुढाऱ्यांना दिली आहे. सोमवारी जरांगे पाटलांच्या उपोषणाचा सहावा दिवस असुन जरांगे पाटलांची प्रकृती खालावत चालल्याने राज्यभरात असंतोष पसरत आहे. आमच्या मतावर निवडून आलात मोठे झालात आणि आता आम्हाला न्याय मिळवून द्यायचा तर कुठेतरी बिळात जाऊ बसले असे म्हणत पुढाऱ्यांना गाव बंद केले आहे. मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमच्या गावात पुढाऱ्यांनी येऊ नये. असे बँनर लावत सुपा, वाळविणे, शहाजापुर ग्रामस्थ व सकल मराठा समाजाने पुढाऱ्यांना गावात न येण्याची तंबी दिली आहे.

निघोज ग्रामसभेत पुढाऱ्यांना गाव बंदीचा ठराव मंजूर

मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी व मनोज जरांगे यांच्या उपोषनाची सरकारने तातडीने दखल घेण्यासाठी निघोजच्या ग्रामसभेत पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. सोमवार दि. ३० रोजी सकाळी १० ते बारा वाजेपर्यंत झालेल्या ग्रामसभेत अनेक ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी तसेच मनोज जरांगे यांच्या उपोषननाची सरकारने दखल घेण्यासाठी ग्रामसभेत पुढारी बंदी करण्यासाठी सुचना केली होती. त्यानुसार ग्रामसभेत सर्वानुमते हे ठराव संमत करण्यात आले तसेच कोनत्याही फ्लेक्सवर बाहेरील पुढाऱ्यांचे फोटो छापू नयेत असाही ठराव संमत करण्यात आला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाची प्रतिक्षा लांबणीवर!

मुंबई | नगर सह्याद्री आता संपूर्ण देशाला मान्सूनची प्रतिक्षा लागली आहे. मान्सूनने केरळमध्ये धडक दिल्याने...

Ahmednagar Crime: धक्कादायक! केसेस करता म्हणून दिव्यांगाला औषध पाजून मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर। नगर सहयाद्री केसेस करतो म्हणून दिव्यांग व्यक्तीला विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला....

Accident News: पुण्यापाठोपाठ नागपूरमध्ये कारचालकाने तिघांना उडवलं!

नागपूर । नगर सहयाद्री- पुण्यात अल्पवयीन चालकाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श कार चालवत दोघांना चिरडल्याची घटना...

Ahmednagar Crime: लिफ्ट देण्याच्या बहाणा,अन भलताच कुटाणा? नगरच्या युवका सोबत घडलं असं काही..

अहमदनगर । नगर सहयाद्री नगरमधील युवकाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवून इमामपूर घाटात लुटले. तसेच,...