नगर सहयाद्री-
मराठा आरक्षणाच्या मागणीच चित्र राज्यात सर्वत्र दिसत आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकार तोडगा काढण्यास अपयशी ठरलं आहे. मराठा आरक्षणासाठी आदोलक आक्रमक भुमिका घेत आहे. पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डात अमरण उपोषण तर निघोज मध्ये कँडल मार्च तर गावागावात साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.
भोयरे गांगर्डात मराठा आरक्षणासाठी अमरण उपोषण
मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या ९ दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या विद्यमान संचालकांनी सामुहिक राजीनामे दिले आहेत. मंगळवार दि.३१ रोजी हे सामुहिक राजीनामे सचिव जासूद यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला व उपोषण सुरू केले. तहसीलदार गायत्री सौंदाणे व सुपा पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी याबाबत निवेदन देण्यात आले.मात्र उपोषणस्थळी आरोग्य तपासणी करणे गरजेचे असूनही आरोग्य विभागाने याकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवल्याने सकल मराठा समाज व ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आरक्षणसाठी गावागावात साखळी उपोषण
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या हंगा गावामध्ये बुधवारी सकाळी साखळी पोषणाला सुरुवात झाली असून काही काळ ग्रामस्थांनी रस्ता रोको करण्याचा निर्णय सुद्धा घेतला होता. मराठा आरक्षण साठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून राळेगणसिद्धी येथे कॅण्डल मार्च काढण्यात आला. तर माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य लाभेश औटीं यांनी आपल्या सदस्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर बाबुर्डी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी तहसील कार्यालयासमोर भजन आंदोलन करण्यात आले.
निघोजमध्ये कँडल मार्च
बुधवार दि १ रोजी सायंकाळी सात वाजता सकल मराठा समाज व निघोज ग्रामस्थ आयोजीत मराठा आरक्षण मिळण्यासाठी काढण्यात आलेल्या कँडल मार्चला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, या सरकारच करायच काय खाली डोकं वर पाय,एक मराठा लाख मराठा या घोषनांनी परिसर निनादून गेला होता. ग्रामपंचायत चौक ते नवी पेठ, एस टी बस स्थानक परिसर तसेच मंळगंगा मंदिरापर्यंत कँडल मार्च काढण्यात आला होता.