spot_img
ब्रेकिंगParner braking: वेषांतर करत कारवाई! पाच सराईत गुन्हेगरांना 'असा' ठोकल्या बेड्या

Parner braking: वेषांतर करत कारवाई! पाच सराईत गुन्हेगरांना ‘असा’ ठोकल्या बेड्या

spot_img

पारनेर। नगर सहयाद्री-
तालुक्यातील धोत्रे शिवारात दरोडाच्या तयारीत असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना पारनेर व सुपा पोलिसांनी शेतकरी व मेंढपाळ लोकांचे पेहराव करुन ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे मिरची पुड सह मोटार सायकल व दोरोड्याचे साहित्य असा एकुण १लाख ८६ हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिली आहे.

सराईत गुन्हेगरांची टोळी कल्याण महामार्गावर दरोडा टाकून लुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळालो होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पारनेर पोलीस व सुपा पोलीस स्टेशनच्या पोलीसांची चार वेगवेगळी पथके तयार केली, व त्यांना वेशांतर करून शेतकरी व मेंढपाळ लोकांचे पेहराव परिधान करत दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ठिकाणी योग्य ते दिशानिर्देश देऊन रवाना केले.

पथकाने अतिशय गोपनीय पद्धतीने नियोजनबद्धरित्या सदर ठिकाणी वेशांतर करून वेगवेगळ्या रस्त्यांनी दरोडेखोर बसलेल्या पायनीचा तलावालगत असलेल्या नाल्यांमधील झाडांमध्ये जाऊन सर्वांनी पूर्वनियोजनानुसार अचानक दरोडेखोरांवर छापा टाकला. पोलीसांनी चहुबाजूंनी वेढून ठेऊन संजय हात्यान भोसले, (रा. वाघुंडे ता. पारनेर ) अक्षय उंब-या काळे.( रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा,) एक विधीसंघर्षग्रस्त बालक, सुंगरीबाई गणेश भोसले, (रा. सुरेगाव ता. श्रीगोंदा ), मनिषा संजय भोसले. (रा. वाघुंडे, ता. पारनेर) असे एकूण पाच दरोडेखोर यांना ताब्यात घेऊन १ लाख ८६ हजार ५७० रूपये. किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग, अहमदनगर संपतराव भोसले, यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, पोलीस उपनिरीक्षक मोतीराम बगाड, पो.ना. गहिणीनाथ यादव, पो.कॉ. सारंग वाघ, सागर धुमाळ, गोवर्धन जवरे, प्रकाश बोबडे, विजय जाधव, मयुर तोरडमल, गणेश डोंगरे, संतोष मगर, विवेक दळवी, म.पो.कॉ. पल्लवी गोरे तसेच सुपा पोलीस स्टेशनचे स.पो.नि. गणेश वारूळे, पो.ना. पवार, पो.ना खंडेराय शिंदे व पो. ना, योगेश सातपुते व पथकाने यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

गुरुवार ठरणार लाभदायक! वाचा, आजचे राशी भविष्य..

मुंबई । नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य शारीरिक आजारातून बरे होण्याचे शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे...

नगरमध्ये लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई; कोण अडकलं जाळ्यात, वाचा सविस्तर

अव्वल कारकून चार लाखांच्या लाचेच्या जाळ्यात अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- रस्त्याच्या कामाची तांत्रिक मान्यता देण्यासाठी...

शिवसेनेला 32 आजी-माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र! भाजपा-एकनाथ शिंदे सेना यापैकी एक पर्याय निवडला जाणार

जनाधार नसलेल्यांच्या आरोपांनी वैतागले पदाधिकारी | गुप्त बैठकीत झाला निर्णय | भाजपा-एकनाथ शिंदे सेना...

राज्यात कुठे-कुठे फेरमतमोजणी? निवडणुक आयोगाकडून कुणाला मिळाला दिलासा…

नाशिक | नगर सह्याद्री:- राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. मात्र विरोधकांकडून ईव्हीएम...