spot_img
अहमदनगरAhmednagar: तुमच्या नावाने ड्रग्जचे पार्सल..; 'त्या' एक कॉलने पाच लाखांना गंडवले

Ahmednagar: तुमच्या नावाने ड्रग्जचे पार्सल..; ‘त्या’ एक कॉलने पाच लाखांना गंडवले

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री

ड्रग्ज असलेले इंटरनॅशनली अनधिकृत पार्सल रद्द करण्याच्या नावाखाली एका सायबर गुन्हेगाराने युवतीकडून पाच लाख आठ हजार रूपये ऑनलाईन घेतल्याची बाब समोर आली आहे. राहाता तालुयातील कोल्हार भगवतीपूर येथील युवतीने या संदर्भात बुधवारी (दि. ८) येथील सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मोबाईल नंबरधारक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार २५ ऑटोबरला घडला आहे. फिर्यादी युवती शिक्षण घेते. तिच्या मोबाईलवर २५ ऑटोबरला एका अनोळखी नंबरवरून फोन आला, ‘मी फेडेस डिपार्टमेंटमधून बोलतो’, असे त्या व्यक्तीने सांगितले. दरम्यान, फोन करणारा व्यक्ती सायबर गुन्हेगार होता व त्याने फिर्यादी युवतीचा विश्वास संपादन करून, तुमच्या नावाने ड्रग्ज असलेले इंटरनॅशनली अनधिकृत पार्सल थायलंड येथे जात आहे.

ते रद्द करायचे असल्यास तुम्हाला पाच लाख आठ हजार रूपये ऐवढी रक्कम भरावी लागेल’, अशी बतावणी केली. फिर्यादी युवतीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन व घाबरून पाच लाख आठ हजार रूपये ऑनलाईन दिले. आपली फसवणूक झाल्याचे युवतीच्या लक्षात आल्यानंतर तिने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शिवसेना-मनसे युती पुन्हा चर्चेत; उद्धव ठाकरेंकडून ग्रीन सिग्नल, राज ठाकरे म्हणाले…

मुंबई / नगर सह्याद्री - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि...

लघवी करण्याच्या कारणावरून गोळीबार करणे भोवले; पोलिसांनी आरोपींना दिली अशी शिक्षा

जामखेड / नगर सह्याद्री - जामखेड - जामखेड येथील विंचरणा नदीच्या पुलावर लघवी करण्याच्या...

नागरिकांना सुविधा द्या; वेळेत कामे पूर्ण करा, कोणी दिले निर्देश पहा

विकासकामे वेळेत पूर्ण करावीत | मनपा कामकाजाचा जिल्हाधिकार्‍यांकडून आढावा अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेच्या विविध विभागांची...

शिर्डीत कुंटणखान्यावर छापा ; पुढे काय घडलं पहा

शिर्डी | नगर सह्याद्री शिर्डी शहरात मंगळवारी सायंकाळी दोन लॉजवर छापा टाकून वेश्या व्यवसाय करणार्‍या...